...अन्यथा तीव्र आंदोलन; मराठा संघटनांकडून राज्य सरकारला इशारा

संभाजीराजांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
Sakal Maratha Samaj
Sakal Maratha SamajEsakal

कोल्हापूर : आक्रमक भाषणे व मराठा समाजाच्या (Maratha Reservation) मागण्यांसाठीच्या आक्रोशाने दसरा चौक (Dasara Chowk) आज दणाणला. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati )यांच्या उपोषणास पाठिंबा देत सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) कार्यकर्त्यांनी शासनावर टीकेची राळ उठवली. संभाजीराजांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

मुंबईतील आझाद मैदानावर संभाजीराजे यांचे कालपासून (ता. २६) उपोषण सुरू झाले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू झाले. आज दुसऱ्या दिवशी शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी चौकात येऊन पाठिंबा दर्शवला.तसेच त्यांनी सडेतोड भाषणे करत मराठा समाजाच्या व्यथा मांडल्या.

Sakal Maratha Samaj
संभाजीराजेंच्या उपोषणाला रशियातून विद्यार्थ्यांचा पाठिंबा
Summary

संभाजीराजांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.

शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी केली नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. संभाजीराजे यांची वेळोवेळी शासनाने फसवणूक केली असून, आता संघर्ष अटळ असल्याचा इशाराही दिला.दि कंझ्युमर प्रोडक्शन डिस्ट्रिब्युटर्स वेल्फेअर असोसिएशन, संयुक्त रविवार पेठ,प्रहार जनशक्ती, भिम ब्रिगेड, राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटना, छत्रपती शिवाजी चौक मंडळाच्या (हळदी) कार्यकर्त्यांनी पाठवण्याची पत्रे समाजाकडे सुपुर्द केली.

संभाजी राजे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. त्यांच्या प्रकृतीची सातत्याने चौकशी कार्यकर्त्यांकडून आज होत राहिली. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी व हुरहूर स्पष्ट दिसत होती. त्यांचे उपोषण जोपर्यंत सुरू असेल तोपर्यंत दसरा चौकात समाज तळ ठोकून राहील, असे सांगण्यात आले.

हळदीतील छत्रपती शिवाजी चौक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हळदीत उद्या (ता. २८) चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांना संयमाने आंदोलन करण्याचे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले. मात्र, त्यांनी आंदोलन करण्याचा पवित्रा कायम ठेवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com