शपथविधी सोहळ्यानंतर संजय राऊतांनी फडणवीसांना दिल्या शुभेच्छा; पण कशाच्या?

Sanjay Raut Congratulate EX CM devendra Fadanvis for selected as Opposition leader
Sanjay Raut Congratulate EX CM devendra Fadanvis for selected as Opposition leader

मुंबई : शिवेसना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता राहणार नाही हा दावा करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा !

राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर आज (ता.२८) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवाजी पार्कवर शपथ घेतली. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सरकार स्थापनेनंतर संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या.

ही बातमी अवश्य वाचा - बाळासाहेब थोरात : १९८५ला पहिल्यांदा अपक्ष आमदार ते ठाकरे सरकारमधील मंत्री

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस हे नेहमी राज्यात विरोधी पक्ष शिल्लक राहणार नसल्याचे सांगत होते. यावरून संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला आहे. तसेच काल (ता.२७) झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्र विकास आघाडीच्या विरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून जाबाबदारी स्वीकारावी असे एकमताने ठरविण्यात आले. त्यानंतर आज शपथविधी झाल्यास संजय राऊत यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या.

ही बातमी अवश्य वाचा - एकनाथ शिंदे : सामान्य शिवसैनिक ते ठाकरे सरकारमधील मंत्री

दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या या शपथविधीला आज अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांबरोबरच देश पातळीवरील अनेक राजकीय नेते या शपथविधीला उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र विकास आघाडीच्या सहा मंत्र्यांचाही आज शपथविधी झाला. यामध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी तर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी आणि काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांचा शपथविधी पार पडला. 

ही बातमी अवश्य वाचा -​ सुभाष देसाई : शिवसेना आमदार ते दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपद
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com