CET Exam : इंजिनिअरिंगच्या सीईटी परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन; 300 हून अधिक विद्यार्थी परीक्षेला मुकले

सर्व्हर डाऊन झाल्यामुळं विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकली नाहीय.
Engineering CET Exam
Engineering CET Examesakal
Summary

सर्व्हर डाऊन झाल्यामुळं विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकली नाहीय.

Engineering CET Exam : बोरिवलीच्या शाळेत (Borivali Engineering School) परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन (Server down) झालं असून 300 हून अधिक विद्यार्थी परीक्षेला मुकले आहेत. तांत्रिक अडचणींमुळं विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नाहीय.

दरम्यान, काहींची परीक्षा सकाळी होती, तर काहींची परीक्षा दुपारच्या सत्रात होती. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्यामुळं विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकली नाहीय. या गोंधळानंतर सीईटीच्या आयुक्तांनी आपली प्रतिक्रिया देऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.

Engineering CET Exam
ममता बॅनर्जी-नितीश कुमार आता मोदी राज संपवतील, शत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर हल्लाबोल

तांत्रिक अडचण दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असून परीक्षेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करु नये. ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकली नाही, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचे सीईटीचे आयुक्त रविंद्र जगताप (CET Commissioner Ravindra Jagtap) यांची सांगितले. दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सर्व्हरची समस्या सुटल्यास त्यांची परीक्षा आताच होईल. तसं न झाल्यास या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील, असंही जगतापांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com