महाराष्ट्रात भाजपचे 'ऑपरेशन लोटस' यशस्वी होणार? काय आहे 'ऑपरेशन लोटस'

Shaikhlal Shaikh Writes about BJP operation lotus in maharashtra
Shaikhlal Shaikh Writes about BJP operation lotus in maharashtra

राज्यात खुर्चीच्या खेळात कोणत्याच पक्षाला आतापर्यंत 144 या जादुई आकड्यांचे पत्र राज्यपालांना देता आले नाही. वेगवान घडमोडीनंतर राज्याला तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. पडद्या समोर आणि पडद्यामागून अनेक हालचाली झाल्या मात्र राज्यात सरकार स्थापन न होता गुंता अधिकच वाढला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सत्ता स्थापनेसाठी भाजपची माघार, आकडे जुळवण्यात शिवसेनेला आलेले अपयश, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या चर्चेच्या गुऱ्हाळात आता शक्‍यता वर्तविला जात आहे ती म्हणजे राज्यात "ऑपरेशन लोटस' राबविले जाईल का? कर्नाटकात भाजपने ऑपरेशन लोटस राबुन कॉंग्रेस-जेडीसएस कडून सत्ता हिसकावून घेतली होती. तोच कित्ता काही दिवसांनी आता राज्यात गिरवला जाईल का? भाजप ऑपरेशन लोटस राबविण्याची हिंमत करेल का? यावर चर्चा सुरु आहे. 

काँग्रेसच्या बैठकीतच शरद पवारांना उद्धव ठाकरेंचा फोन
 
काय आहे ऑपरेशन लोटस 
सुरवातीला 2004 मध्ये कर्नाटकात धरमसिंह यांचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केला गेला होता तेव्हा पासून "ऑपरेशन लोटस' हा शब्द चर्चेत आला. सन 2008 मध्ये कर्नाटकात 224 जागांपैकी भाजपने 110 जागा जिंकल्या होत्या. सर्वात मोठा पक्ष असला तरी ते बहुमताच्या 113 च्या जादुई आकड्यापासून भाजप दुर होती. कॉंग्रेस पक्षाने 79 तर जेडीएस ला 28 जागा मिळाल्या होत्या. या परिस्थिती भाजपने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी "ऑपरेशन लोटस' हा फार्मुला तयार केला. मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांनी सर्व साम-दाम-दंड भेदची खेळी खेळुन 2008 ते 2013 या सत्तेच्या काळात कॉंग्रेस आणि जेडीएसचे तब्बल 20 आमदारांना राजीनामा देण्यास लावले. पोटनिवडणुकीत आमदार विजयी झाल्यानंतर भाजपला विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळविता आले. अशा प्रकारे त्यांनी पाच वर्ष सरकार चालविले. 

असा असेल महाशिवआघाडीचा पुढील कार्यक्रम
 
2019 मध्ये ही कर्नाटकात ऑपरेशन लोटस 
सन 2018 मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 224 पैकी भाजपने सर्वाधिक 104, कॉंग्रेस 80, जेडीएसने 37 जागांवर विजय मिळविला होता. सर्वात मोठा पक्ष असल्याने राज्यापालांनी येदीयुरप्पा यांना सरकार बनविण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र त्यांनी बहुमत सिद्ध करण्याअगोदरच राजीनामा दिला. त्यानंतर कॉंग्रेसने पाठींबा दिल्याने जेडीएसचे कुमारस्वामी हे मुख्यमंत्री झाले. यानंतर येदीयुरप्पा यांनी ऑपरेशन लोटस 3.0 राबवुन कॉंग्रेस-जेडीएसच्या 17 आमदारांना राजीनामा देण्यास यश मिळविले. इतकेच नव्हे तर पुन्हा मुख्यमंत्री विराजमान झाले. यानंतर विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी या सर्व आमदारांना अपात्र ठरविले होते. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे अपात्रेची टांगती तलवार आमदारांवर असल्याने राज्यात अशी हिंमत कोणता आमदार दाखवेल का? अशी चर्चा आता सुरु आहे. 

चंद्रकांतदादांच्या शुभेच्छांमुळेच आम्ही आघाडीसोबत- उद्धव ठाकरे

राज्यात ऑपरेशन लोटस यशस्वी होईल का? 
105 जागा जिंकुन राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला. मात्र शिवसेनेसोबत सत्तेच्या वाट्याची बोलणी फिस्कटल्यानंतर राज्यपालांना त्यांना सत्तेसाठी नकार कळवावा लागला. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा 56 जागा असलेल्या शिवसेनाला सुद्धा बहुमतांच्या जादुई आकड्यांच्या जुळवाजुळवीचे पत्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून मिळवता आले नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागु झाली. 

राष्ट्रपती राजवट म्हणजे काही लोकांचा हट्ट- सुधीर मुनगंटीवार

शिवसेना-भाजप महायुतीला राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिले. त्यांच्याकडे 161 आकडा जादुई आकडा असतांनासुद्धा दोघांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन युती संपुष्टात येण्यापर्यंत प्रकरण गेले. आता शिवसेना 56, राष्ट्रवादी 54 तर कॉंग्रेस 44 या तिघांमिळून सत्ता स्थापनेचा तिढा सुद्धा कायम आहे. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्याने भाजपकडून ऑपरेश लोटस राबविले जाईल का याची दबक्‍या आवाजाच चर्चा सुरु आहे. 

भाजप कार्यकर्ते म्हणतात नगराध्यक्ष आमचाच

महाराष्ट्रात कर्नाटक प्रमाणे राजकीय परिस्थिती नसल्याने ऑपरेशन लोटस राबविले आणि त्यात आमदारांनी राजीनामा दिला तरी ते पुन्हा भाजपच्या चिन्हावर विजयी होतील याची सध्या तरी कोणती ही शाश्‍वती भाजप नेते सुद्धा देऊ शकत नाही. निवडणुकीअगोदर जे नेते भाजपमध्ये गेले होते त्यातील काही मातब्बरांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिवाय सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयराजेंना मतदारांनी पराभवाचा धक्का दिला होता. 

उद्धव ठाकरेबद्दल राणे म्हणतात...

सध्या शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फुटणार का ? यावर चर्चा केली जात आहे. सत्ता स्थापनेचा गुंता असला तरी आमदार राजीनामा देवुन भाजप मध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता कमी दिसते. 105 वरुन थेट 144 जा जादुई आकडा गाठणे हा मोठा डोंगर सर करण्यासारखे आहे. सध्या विजयी झालेले राज्यातील सर्व 13 अपक्ष आणि 1 रासप, तीन बहुजन विकास आघाडी आमदारांना जरी सोबत घेतली तरी हा आकडा 122 पर्यंतच जातो. विशेष म्हणजे सर्व 13 अपक्ष भाजप सोबत जाण्याची शक्‍यता कमीच आहे.

भाजपचा आकडा 122 पर्यंत गेला तरी पुढील आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठ्या संख्येने आमदारांना राजीनामा देण्याची चाळ खेळणे, राजीनामा दिलेल्यांना पुन्हा विजयी करणे हे सहज शक्‍य नाही. मतदारांनी निवडणुकीत आयाराम गयारामांना दिलेला पराभवचा झटका तसेच बदलेल्या राजकीय परिस्थितीत भाजपसाठी "ऑपरेशन लोटस' महाराष्ट्रात यशस्वी करणे सोपे नाही. 

महाराष्ट्रातील सध्या पक्षीय बलाबल असे 
भाजप-105 
शिवसेना-56 
राष्ट्रवादी-54 
कॉंग्रेस-44 
बहुजन विकास आघाडी-3 
कम्युनिस्ट पार्टी (मार्क्‍सवादी)- 1 
अपक्ष-13 
जनसुराज्य शक्ती- 1 
क्रांतीकारी शेतकरी पक्ष- 1 
मनसे -1 
शेकाप- 1 
प्रहार जनशक्ती- 2 
रासप - 1 
समाजवादी पार्टी- 2 
स्वाभीमानी पक्ष - 1

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com