Sharad Pawar : राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण?, शरद पवारांनी विषयच मिटवला

Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) मध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे.  पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शरद पवार यांनी दिल्लीत ही घोषणा केली. पक्षाचा हा निर्णय ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचा पुढील पक्षाध्यक्ष कोण होणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शरद पवार म्हणाले चर्चेतून सहकाऱ्यांना जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. महिन्यात ४ वेळा इतर राज्यातील संघटना वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण होणार? यावर शरद पवार म्हणाले, लोक आहाग्रस्तव सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्षा करण्यात आले आले. इतर सहकराऱ्यांवर जबाबदारी देण्याचा निर्णय देखील आधीच केला होता. पक्षाध्याक्षाची जागा आता खाली नाही. जेव्हा जागा खाली होईल तेव्हा बघू. अजित पवार नाराज असल्याची बातमी खरी नाही आहे. जयंत पाटील आज महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अजित पवार विरोधीपक्षनेते आहेत. त्यांच्यावर आधीच मोठी जबाबदारी आहे.

Sharad Pawar
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

२३ जूनला पाटनामध्ये विरोधकांची सभा आहे. भाजपची ताकद जास्त असणाऱ्या ठिकाणी विरोधकांना एकत्र आणणार आहोत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुखपदाची जबाबदारी सोडण्याची घोषणा केली होती. मात्र, कार्यकर्त्यांची नाराजी आणि नेत्यांच्या समजूतीनंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता. पवार यांच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने ५ मे रोजी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला होता आणि त्यांना पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली होती. आता पक्षाच्या हायकमांडने दोन नवीन कार्याध्यक्षांची नियुक्ती कल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : अजित पवारांना पद का दिलं नाही?, शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com