
Shinde Camp MLA Sanjay Gaikwad Canteen Controversy Food Department Gives Clean Chit
Esakal
Shinde Group: आमदार निवासात असलेल्या कँटिनमध्ये शिळं अन्न दिल्याच्या आऱोपावरून कँटिन चालकाला उपमुख्यमंत्री शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केली होती. पावसाळी अधिवेशन या मुद्द्यामुळं गाजलंही होतं. यानंतर कँटिनचा परवाना रद्द करण्यात आला होता. पण आता महिन्याभरातच कँटिनला क्लीन चीट देण्यात आली आहे. कँटिनमध्ये कोणतेही अवैध पदार्थ नव्हते असा शेरा देण्यात आला आहे. यामुळे आता विनाकारण कँटिनला आमदाराने राडा घालून बदनाम केल्याची चर्चा रंगली आहे.