Shirval  Police Station
Shirval Police StationSAKAL

Shirval: त्रासाला कंटाळून युवतीने उचलले टोकाचे पाऊल; पोलिसांनी आरोपीला केली अटक

Shirval: शिरवळ येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीने शिरवळ येथील दत्तनगर येथे राहणाऱ्या अक्षय लांडगे याचे विरोधात विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. परंतु सदर गुन्ह्यातील आरोपी सात दिवसाच्या आत जामिनावर सुटल्याने भीती व नैराश्यपोटी शनिवारी (ता.१६ )रोजी पहाटे चार वाजता राहत्या घरात या युवतीने साडीच्या साह्याने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली .

Shirval  Police Station
Satpur Police Station: सातपूर पोलिस ठाण्याची नूतन इमारत धूळखात; सातपूरकरांसह पोलिसांनाही प्रतिक्षा

याबाबतची माहिती अशी कि, या युवती ला या अक्षय लांडगे याने पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली . तसेच या युवती च्या आई ला दमदाटी करून, अंगावर गाडी घातली होती . या सर्व प्रकरणावरून या युवतीने हे पाऊल उचलले व राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली .

या आत्महत्या पूर्वी या युवतीने चिठ्ठी लिहून संबंधित अक्षयला शिक्षा करण्याची मागणी केली आहे .तसेच या कृत्या बाबत आपल्या आईवडीलांची माफी मागुन, आपल्याला होणारा त्रास व या मुलाच्या छेडछाडीमुळे आत्महत्या केल्याचे दोन पानी पत्र लिहुन ठेवले आहे .

Shirval  Police Station
Maharashtra Police: वसईत पोलिसांची शंभर नंबरी कामगिरी; गुन्ह्यांमध्ये झाली मोठ्या प्रमाणावर घट

दरम्यान सांगवी ग्रामस्थांनी या युवतीचे पार्थिव अॅम्बुलन्स मधून पोलीस स्टेशन पुढे आणत पोलिसांच्या कामगिरी विरोधात संताप व्यक्त केला. यावेळी तणाव निर्माण झाला होता . या घटनेची नोंद शिरवळ पोलिसात झाली असुन, या घटनेचा तपास शिरवळ पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे करीत आहे .

अक्षय लांडगे हा यावेळी पुरंदर तालुक्यात गेला होता . यावेळी पोलिसांनी मोठ्या शिफातीने या लांडगे यास १२ तासाच्या आत तत्काळ बेड्या ठोकल्या. दरम्यान, शिरवळ पोलीस स्टेशन समोर नातेवाईकांनी मृतदेह आणुन गोंधळ घातला.

Shirval  Police Station
Police Band Competition : महाराष्ट्र पोलिस संघास दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com