...म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला गेलो- रामदास कदम

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 November 2019

शिवसेना ही शेतकऱ्यांसोबत नाही असे कुठेही जनतेला वाटायला नको, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यासोबतच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीला गेलो होतो. असे स्पष्टीकरण शिवसेनेचे नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी दिले आहे.  मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ओला दुष्काळावर बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिवसेनेचेही मंत्री उपस्थित होते.

मुंबई : शिवसेना ही शेतकऱ्यांसोबत नाही असे कुठेही जनतेला वाटायला नको, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यासोबतच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीला गेलो होतो. असे स्पष्टीकरण शिवसेनेचे नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी दिले आहे.  मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ओला दुष्काळावर बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिवसेनेचेही मंत्री उपस्थित होते.

कदम म्हणाले, 'सरकार स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नसून सरकारला ठणकावून सांगण्यासाठी आम्ही बैठकीला आलो आहोत. १२ दिवस सरकार स्थापन झालं नाही हे आम्हाला विचारण्यापेक्षा हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारायला हवं.  सत्तास्थापनेबाबत, उद्धव ठाकरे हे आमचे नेते असून ते मांडतील ती आमची अंतिम भूमिका ‌असेल'.

शिवसेनेला बाहेरून पाठींबा देण्याबद्दल वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य..

सत्तास्थापनेबाबत संभ्रमाचं वातावरण असताना सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ओला दुष्काळावर बैठक घेण्यात आली. विशेष म्हणजे शिवसेना-भाजपात मुख्यमंत्रिपदावरुन तणाव असताना या बैठकीला शिवसेनेचे 06 मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर यातील 02 मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत सत्तास्थापनेवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत असले तरी, कदम यांनी याबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले आहे.

आम्हाला हवेत सरसकट मुख्यमंत्री

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे , दिवाकर रावते, रामदास कदम, दिपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्य सरकारमध्ये एक सुकाणू समिती असावी आणि त्यांचे अध्यक्ष उद्धव ठाकरे असावेत, असा एक प्रस्ताव असल्याचं सांगण्यात येत आहे. तर काही अटी आहेत, पण शिवसेना  पाठिंबा देण्याच्या मनःस्थितीत असल्याचंही सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Leader Ramdas Kadam speak after Shivsena leader meets Cm Fadanvis