शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच जुळणार; राष्ट्रपती राजवट लागली तरीही...

politics
politics

मुंबई : सत्तास्थापनेचा घोळ सुरू असला तरी राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच सत्ता स्थापन करणार असून सत्तेतील पदांचे वाटप करण्यासाठी वेळ लागत असल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती माहिती आहे. 

काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेवा सत्तास्थापनेसाठी पत्र दिले नसल्याने राजकिय गोंधळ सुरू आहे. मात्र शिवसेना व राष्ट्रवादीमधे मुख्यमंत्रीपदीसह इतर खाती, विेधानसभा व विधान परिषदेतील पदांचे वाटप व्हावे. याशिवाय संयुक्त कार्यक्रमाचा सहमतीचा आराखडा तयार करूनच सत्तास्थापनेचा दावा केला जाईल असे सांगण्यात येते. 

सुरूवातीला शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील यावर राष्ट्रवादीसह काँग्रेसची देखील सहमती असून राष्ट्रवादीलाही मुख्यमंत्रीपद असावे यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधे चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला तर इतर प्रमुख विभागांचे वाटप कसे असेल याबाबत चर्चा होतील. 

दरम्यान, सत्तावाटपाच्या या सर्व चर्चेला वेळ लागणार असल्याने राष्ट्रपती राजवट सुरू झाली तरी हरकत नाही असा मतप्रवाह दोन्ही काँग्रेस व शिवसेना नेत्यामधे आहे. 
भाजप शिवसेनेची युती संपुष्टात आली असून शिवसेना भाजप प्रणित एनडीए तून बाहेर पडली आहे. त्यामुळे शिवसेने सोबतच जाताना या सर्व पर्यायांची सविस्तर चाचपणी व एकमत करूनच सत्तास्थापनेचा दावा केला जाईल असे सांगण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com