Sindhudurg : विजयदुर्ग किनाऱ्याजवळ दुबईतलं जहाज बुडालं; 19 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात जवानांना यश

दुबईहून-बंगळुरुच्या दिशेनं जाणारं पार्थ हे तेलवाहतूक करणारं जहाज विजयदुर्ग किनाऱ्यानजीक बुडालं.
Ratnagiri Coast Guard
Ratnagiri Coast Guardesakal
Summary

दुबईहून-बंगळुरुच्या दिशेनं जाणारं पार्थ हे तेलवाहतूक करणारं जहाज विजयदुर्ग किनाऱ्यानजीक बुडालं.

Sindhudurg News : सिंधुदुर्गमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. दुबईहून-बंगळुरुच्या (Dubai) दिशेनं जाणारं पार्थ हे तेलवाहतूक करणारं जहाज विजयदुर्ग (Vijaydurg) किनाऱ्यानजीक बुडालं. सुदैवानं या जहाजावरील (Parth Ship) सर्व कर्मचाऱ्यांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आलंय.

Ratnagiri Coast Guard
Shiv Sena : ..तर कोल्हापूरच काय, देश सोडून जातो; शिवसेना नेत्याचं राजेश क्षीरसागरांना ओपन चॅलेंज

रत्नागिरीतील तटरक्षक दलाच्या (Ratnagiri Coast Guard) कर्मचाऱ्यांनी वेळीच मदतकार्य सुरू केल्यामुळं त्या जहाजावरील 19 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलं. जहाजाच्या तळाला मोठे भोक पडल्याने विजयदुर्ग किनार्‍यापासून चाळीस वावमध्ये तेल वाहतूक करणारे दुबई येथील पार्थ हे जहाज बुडालं. हे जहाज दुबईतून बंगळूरच्या दिशेनं जात होतं.

Ratnagiri Coast Guard
Narendra Modi : PM मोदींना वाढदिवसानिमित्त तुम्हीही 'शुभेच्छा' पाठवू शकता; फक्त 'हे' काम करावं लागेल

यावेळी या जहाजावर 19 कर्मचारी होते. जहाज बुडत असल्याचं लक्षात येताच जहाजावरील कर्मचाऱ्यांनी तटरक्षक दलाशी संपर्क साधला. त्यानंतर रत्नागिरीतील तटरक्षक दलानं येवून या जहाजावरील 19 कर्मचाऱ्यांना वाचविलं आहे. ही घटना शुक्रवारी घडलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com