शिवसेनेसोबत मनसेचीही अस्तित्वाची लढाई; राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये

राज ठाकरेंनी आज सलग दुसऱ्यांदा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySakal

शिवसेना ठाकरेंची की शिंदेची, यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेनेचं अस्तित्व आता सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे. एकीकडे ही लढाई सुरू असतानाच मनसेही आपल्या अस्तित्वासाठी झगडत असल्याचं दिसत आहे. राज ठाकरे आता चांगलेच सक्रिय झाले आहेत. शिवतीर्थवर मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये वाढ झाली आहे. (Raj Thackeray MNS in Action Mode)

Raj Thackeray
महापालिका निवडणुकीसाठी ‘मनसे’ पदाधिकाऱ्यांची बैठक

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. मुंबईतील विधानसभा निहाय परिस्थितीचा राज ठाकरे स्वतः आढावा घेतायत. आज मध्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेत आहेत. धारावी, माहीम या पट्ट्यातील अनेक पदाधिकारी सकाळपासूनच शिवतीर्थावर उपस्थित आहेत.

Raj Thackeray
SC Live : ''लक्ष्मणरेषेचं उल्लंघन न करता पक्षांतर्गत आवाज उठवणं म्हणजे बंडखोरी नाही''

संघटनात्मक बांधणी, पक्षीय स्थिती, स्थानिक परिस्थिती तसेच निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे पदाधिकारी या याबाबत बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) सध्या पुनर्बांधणी दौऱ्यावर आहेत. मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानांतर्गत काल सकाळी मिरा भाईंदर, दुपारी वसई विरार आणि रात्री पालघर बोईसर येथे अमित ठाकरे यांनी दौरा केला. सध्या अमित ठाकरे सात दिवसांचा पालघर दौऱा करत आहे. या दरम्यान, मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी उपस्थित राहिल्याचं दिसून येत आहे.

Raj Thackeray
युवा शक्ती ही देशाची खरी शक्ती ः अमित ठाकरे

एकीकडे शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या सुनावणीमध्ये शिवसेनेचं भविष्य ठरणार आहे. आता या शिवसेनेतल्या फुटीमुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सगळ्या राजकीय परिस्थितीचा फायदा मनसे घेत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मनसेने बैठकांचा, दौऱ्यांचा जणू धडाकाच लावला आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका ही मनसेच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com