T. N. Sheshan : जेव्हा लालूंनी शेषन यांना रेड्यावर बसवून गंगेत धिंड काढण्याची धमकी दिली होती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T. N. Sheshan

T. N. Sheshan : जेव्हा लालूंनी शेषन यांना रेड्यावर बसवून गंगेत धिंड काढण्याची धमकी दिली होती

T. N. Sheshan : जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या आपल्या देशात खऱ्या अर्थाने निकोप निवडणुकांचे पर्व सुरू झाले ते तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त तिरुनेल्लाई नारायण अय्यर शेषन उर्फ टी.एन. शेषन यांच्या कारकीर्दीपासून.

हेही वाचा: Aloo Methi Bhaji Recipe : मुलं पालेभाज्या खात नाहीयेत? मग या पद्धतीने ट्राय करा बटाटा मेथी भजी रेसिपी

उत्तर भारतात निवडणुकांतील हिंसाचार ही पहिल्यापासूनच मोठ्या चिंतेची बाब होती. निवडणुकीत होणारा पैशाचा वारेमाप वापर, प्रचारातील गैरवापर, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतपेट्या पळवणे, मत मोजणीच्या वेळी अपेक्षित निकाल लागला नाही तर तेथे होणारा गोंधळ या सर्वांमुळे निवडणुका वादग्रस्त व्हायच्या.

हेही वाचा: Palazzo Fashion : रेग्युलर प्लाजो वर अशा टॉप्सने क्रिएट करा वेस्टर्न लुक

पण या सगळ्याला चाप लावण्याचं काम केलं ते दहावे मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी. तमिळनाडूत जन्मलेल्या या अधिकाऱ्याने भारतातील निवडणुकीची दिशाच बदलून टाकण्याचं धाडस दाखवलं. जे या आधी कुणीच दाखवलं नव्हतं.

हेही वाचा: Holiday Calendar 2023 : पुढचं वर्ष खाणार सगळ्या सुट्ट्या; वीकेंडलाच आले आहेत सगळे सण

टी एन शेषन यांनी 1995 च्या बिहार विधानसभा निवडणुकीपासून निवडणूक सुधारणा मोहिमेला सुरुवात केली. त्या काळात बिहारचे मतदान केंद्र लूट आणि हिंसाचारासाठी कुप्रसिद्ध होते. शेषन यांनी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यावर भर दिला. त्यासाठी त्यांनी चोख सुरक्षा व्यवस्था केली. तसेच, पहिल्यांदाच टप्प्याटप्प्याने मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: Cucumber Thalipeeth Recipe : बनवा खूशखुशीत,खमंग अन् हेल्दी काकडीचे थालीपीठ

1995 च्या विधानसभा निवडणुकीत लालू बिहारमध्ये दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात होते. विरोधी पक्षांनी लालूंवर निवडणुकीत अधिकार्‍यांशी संगनमत करून भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्याची शेषन यांनी गांभीर्याने दखल घेतली.

हेही वाचा: Tandalachi Kheer Recipe: सोमप्रदोषा निमित्त बनवा खास तांदळाची खीर, महादेवांना दाखवा नैवेद्य

स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांची स्मशानभूमी समजल्या जाणाऱ्या बिहारमध्ये शेषन यांनी आदर्श ठेवण्याचं ठरवलं. राज्यात पॅरा मिलिटरी फोर्स मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आल्या. पहिल्यांदाच अनेक टप्प्यांत निवडणुका झाल्या. शेषन यांनी विविध कारणांमुळे त्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा चार वेळा बदलल्या. त्यामुळे लालू प्रसाद यादव त्यांना आपल्या विजयाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा मानू लागले. लालू आपल्या टिपिकल शैलीत शेषन यांच्यावर टीका करू लागले.

हेही वाचा: Mens Short Kurta Fashion : तरूणांनो तीच स्टाइल करून कंटाळलात? शर्ट्समध्ये आलाय हा नवा ट्रेंड

पत्रकार संकर्षण ठाकूर यांनी त्यांच्या 'द ब्रदर्स बिहारी' या पुस्तकात त्यावेळी काय काय घडलं याचा किस्सा लिहिलाय. निवडणुकीदरम्यान रोज सकाळी लालूंच्या निवासस्थानी ज्या अनौपचारिक बैठका व्हायच्या त्यात लालूंच्या संतापाच्या केंद्रस्थानी शेषन असायचे. अशाच एका सभेत ते म्हणाले होते, "शेषन पगला सांड जैसा कर रहा है। मालूम नहीं है कि हम रस्सा बांध के खटाल में बंद कर सकते हैं।

हेही वाचा: Fashion Tips : वर्क फ्रॉम होम करताना परफेक्ट आउटफ़िट कोणते घालावे? ; या सेलेब्सकडून घ्या टिप्स!

ठाकूर लिहितात की शेषन यांनी चौथ्यांदा निवडणूक पुढे ढकलल्यावर लालू यादव यांचा राग शिगेला पोहोचला होता. तेव्हा लालू स्वतः वेड्या बैलासारखे झाले होते. लालू यादव यांनी बिहारचे तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी आरजेएम पिल्लई यांना फोन करून झापलं होतं.

हेही वाचा: Cucumber Thalipeeth Recipe : बनवा खूशखुशीत,खमंग अन् हेल्दी काकडीचे थालीपीठ

लालू म्हणाले, "पिल्लई, हम तुम्हारा चीफ मिनिस्टर और तुम हमारा अफसर। ई शेषनवां कहां से बीच में टपकता रहता है? ...फैक्‍स भेजता है। ...सब फैक्‍स-वैक्स उड़ा देंगे, इलेक्शन हो जाने दो।"संकर्षण ठाकूर यांनी लिहितात की, लालू यादव त्या काळात शेषन यांना त्यांच्याच शैलीत शिव्या द्यायचे.ते म्हणायचे, "'शेषनवा को भैंसिया पे चढ़ाकर गंगाजी में हेला देंगे।''निवडणुकीत लालू पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने उदयास आले.

हेही वाचा: Tandalachi Kheer Recipe: सोमप्रदोषा निमित्त बनवा खास तांदळाची खीर, महादेवांना दाखवा नैवेद्य

बरं, बिहार विधानसभेची ती निवडणूक संपली. निवडणुकीचा निकाल लालू यादव यांच्या बाजूने लागला. पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने ते सत्तेवर आले. निवडणुकीत बूथ लुटणे वगैरे काही झालं नाही, आणि लालूंना त्याचाच फायदा झाला. त्यामुळे राज्यातील अगदी छोट्या भागातही त्यांचा संदेश पोहोचवण सोपं झालं होतं.

हेही वाचा: Winter Recipe : मुलांसाठी बनवा हेल्दी टेस्टी गाजर फ्रेंच फ्राइज

अर्थात शेषन यांना हे करताना प्रचंड विरोध झाला. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या निवडणुकीतील अमुलाग्र बदलांना विरोध केला. पण या गृहस्थाने कुठल्याही दबावाला बळी न पडता निवडणुकीत सुधारणा घडवून आणल्या. त्यामुळे आज ज्या काही निकोप निवडणुका होत आहे, त्याचे श्रेय फक्त आणि फक्त टी. एन. शेषन यांना जाते.

टॅग्स :politicalpolitical leader