संगीत महाविद्यालयाचं नाव आता 'भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर'

या परिसरात केवळ सांगीत महाविद्यालयच नाही तर संग्रहालयही होणार
Uday Samant
Uday Samantsakal
Summary

या परिसरात केवळ सांगीत महाविद्यालयच नाही तर संग्रहालयही होणार

मागील काही दिवसांपूर्वी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत 'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली होती. दरम्यान, यावर आता सामंत यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र शासनच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय करणार होतो, परंतु मंगेशकर कुटुंबियांच्या सूचनेनुसार भारतरत्न लता-दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

यावेळी ते म्हणाले, मुंबई विद्यापीठात (Mumbai University) या महाविद्यालयासाठी कलिना कॅम्पस बाहेर तीन एकर जागा देण्याचा निर्णय झाला आहे. या परिसरात केवळ सांगीत महाविद्यालयच नाही तर म्युझियमही होणार आहे. देशातील अशा प्रकारचे हे पहिलेच संगीत महाविद्यालय महाराष्ट्रात (Maharashtra) होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Uday Samant
आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राज्य - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पुढे ते म्हणाले, संगीत महाविद्यालयाचा जागेचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे विद्यापीठाकडे जागा मागण्याचा प्रश्न येत नाही. विद्यापीठाच्या या निर्णवयावर मंगेशकर कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या म्हणण्यानुसार हे संगीत महाविद्यालयाचे (Music College) भूमिपूजन त्यांच्या हयातीत झाले असते तर त्यांनाही आनंद झाला असता. मात्र आमचं दुर्दैव की, विद्यापीठानं जागा देण्याच नाकारलं होतं. मात्र आता लवकरच या परिसरत त्यांच्या नावाने संगीत महाविद्यालय सुरु होणार आहे.

दरम्यान लता मंगेशकर यांच्या स्मारका संदर्भातील प्रश्नावर ते म्हणाले, मला राजकारणात जायचं नाही. मी हृदयनाथ मंगेशकर यांची प्रतिक्रिया पाहिली. लतादीदींच्या स्मारकावरून कोणीही राजकारण करू नये वाद करू नये. लता-दीनानाथ मंगेशकर लवकरात लवकर व्हावं यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Uday Samant
स्वप्न उतरलं सत्यात; सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजला अखेर मान्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com