शिवसेनेची भूमिका फक्त संजय राऊतच मांडणार : उद्धव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

‘शिवसेनेचा जन्मचं स्वाभिमानातून झाला आहे. त्यामुळे मी स्वाभिमानानं जे ठरलं त्यावर ठाम आहे. मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नये’, असे सांगत सर्व शिवसेना आमदारांनी एकत्र सोबत रहावे असे आदेश दिले. 

मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान युतीचा जो फाॅर्मुला ठरला त्या नुसारच व्हावे. मी स्वत:हून युती तोडणार नाही. असे स्पष्ट करत शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडण्याचे सर्वाधिकार केवळ खासदार संजय राऊत यांनाच राहतील. असा आदेशच आज उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत दिले. 

राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे?; घोळ मिटेना

आज मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरे भावूक व आक्रमक होते. ‘मला एक कण ही जास्तीचे नको. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जे ठरलं ते जाहीर करावे. त्यांना जे ठरलं ते मान्य असेल तरच चर्चेला बसता येईल. अशी भूमिका ठाकरे यांनी यावेळी मांडली.

मुनगंटीवार म्हणतात,शिवसैनिकच होणार मुख्यमंत्री

‘शिवसेनेचा जन्मचं स्वाभिमानातून झाला आहे. त्यामुळे मी स्वाभिमानानं जे ठरलं त्यावर ठाम आहे. मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नये’, असे सांगत सर्व शिवसेना आमदारांनी एकत्र सोबत रहावे असे आदेश दिले. 

मला स्वतःहून युती तोडायची नाही : उद्धव ठाकरे 

यावेळी सर्वच आमदार आक्रमक होत मुख्यमंत्री शिवसेनेचाच करूया. असा पवित्रा घेत सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना दिले. दरम्यान, शिवसेनेची अधिकृत भूमिका खासदार संजय राऊत मांडत अाहेत. सत्तास्थापने संदर्भात यापुढेही केवळ संजय राऊतचं बोलतील असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray says Sanjay Raut clears Shivsena stands