
'घरातून बाहेर पडत नाही' या आरोपाला उद्धव ठाकरेंनी काय उत्तर दिलं?
दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) मुलाखत घेतली. शिवसेना आमदारांचा एक गट फुटल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असलेले सरकार कोसळले आणि त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या मुलाखतीत शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील बदलते राजकारण यावर प्रखरपणे उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.
हेही वाचा: महाराष्ट्रात पण झाडं, डोंगर, हाटेल आहे; उद्धव ठाकरेंचा टोला
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घरातून कधीही बाहेर पडत नव्हते, असा आरोप सातत्याने केला जायचा. या आरोपावर उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत उत्तर दिलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, "घराबाहेर न पडतासुद्धा देशातल्या सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांत नाव का आलं माझं? कारण त्यावेळेला ती परिस्थितीच तशी होती. मी स्वतः सांगत होतो घराबाहेर पडू नका आणि ते लोक ऐकत होते. मी जर का तेव्हा घराबाहेर पडलो असतो किंवा आजही पडलो तरी शिवसेनाप्रमुखांच्या, माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे गर्दी होतेच. म्हणजे मग काय झालं असतं की, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण."
हेही वाचा: 'उद्धवा दिलेली स्क्रिप्ट नीट पाठांतर कर'; भाजपनं पवारांसोबत शेअर केलं व्यंगचित्र
समोर ते म्हणाले, " ही काळाची गरज होतीच… पण मी पुन्हा एकदा सांगतो सुरुवातीच्या काळात कोरोनाचा आपल्याकडे शिरकाव झाला हे कळलं तेव्हा साधारण साडेसात ते आठ हजार रुग्ण संख्या आपल्या राज्यात झाली होती. नंतर मग त्यासाठी ऑक्सिजन बेड्स आले, व्हेंटिलेटर्स आले. कॉमन रुग्ण होते ज्यांना थोडी ट्रिटमेंट देऊन घरी पाठवता येऊ शकतं. "
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "पहिल्या लाटेत साधारणतः आठ हजार रुग्ण धरले तर ते साडेतीन लाखावर गेले… ते घरबसल्या.. हॉस्पिटल्समध्ये तर बेड्स नव्हते, रुग्णवाहिका नव्हत्या. कोणी कशी व्यवस्था केली त्याची? कोरोनाच्या टेस्टसाठी तर आपल्या राज्यात फक्त दोन प्रयोगशाळा होत्या. एक कस्तुरबामध्ये आणि एक एनआयव्हीएम पुणे येथे. त्या सहाशेच्या वर प्रयोगशाळा आपण उभ्या केल्या, ते घरी बसून?
हेही वाचा: लवकरच महाराष्ट्राचं वातावरण शिवसेनामय झालेलं दिसेल - संजय राऊत
उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर न पडतासुद्धा देशातल्या पाच सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांत माझं नाव का आलं, असा टोला लगावला. याशिवाय शिवसेनाप्रमुखांच्या माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे गर्दी होते, त्यामुळे ते घराबाहेर पडले नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. सोबतच मी जर घराबाहेर पडलो असतो तर 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण' असं असतं, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
Web Title: Uddhav Thackerays Replied On The Allegation Done By Opposition During His Cm Period
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..