Woman Empowerment
Woman Empowermentesakal

Woman Empowerment : मोफत पिठाची गिरणी हवीये? असा करा अर्ज

महिलांना 100 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी देण्यात येणार आहे. जाणून घ्या माहिती.
Published on

Government Scheme: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून कुटुंबाला सबळ करण्यासाठी सरकार वेगवेगळी स्कीम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यातच आता सरकार महिलांना मोफत पिठाची गिरणी देणार आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत मात्र महिलांना 100 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी देण्यात येणार आहे. या योजनेचा मुख्य हेतू हा खेड्यातील महिलांना रोजगार मिळावा व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी हा आहे.

Woman Empowerment
शासकीय योजना लाभार्थींपर्यंत पोहोचवा

पिठाची गिरणी महिलांना चांगला रोजगार उपलब्ध करून देईल आणि महिलांना घरी बसून चांगले उत्पन्न मिळेल. यामुळे ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्या महिला या योजनेचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात. महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत, नमूना अर्ज जाणून घ्या माहिती.

Woman Empowerment
अडीच लाख शासकीय पदे रिक्‍त ! वरिष्ठ अधिकाऱ्यांची शासनाला स्मरणपत्रे; शासकीय योजना रखडल्या

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदार ही १२ वी शिकलेली असल्याचा पुरावा

  • अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत

  • अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज

  • घराचा ८अ उतारा

Woman Empowerment
शासकीय योजनांच्या पाठपुराव्याची गरज
  • लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख २० हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा (तहसीलदार कडून किंवा तलाठी कडून)

  • बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स

  • लाईट बिलची झेरॉक्स

  • या योजनेचा लाभ हा १८ ते ६० वयोगटातील मुली व महिलांना मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com