यंदाच्या गणेशोत्सव होणार मिरवणुकांविना!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

मदतीबद्दल मानले आभार
पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी या वर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतला आहे. याबद्दल तसेच सरकार जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. शिर्डी, सिद्धिविनायक व इतर संस्थांनी त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी देखील मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री साह्यता निधीसाठी जी मदत केली तसेच सामाजिक उपक्रम राबविले, त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

मुंबई - ‘कोरोनाचा धोका अद्यापही संपलेला नाही. नेहमीप्रमाणे यंदा गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्‍यात साजरा करता येणार नाही. त्यामुळे गर्दीही करता येणार नाही, तसेच मिरवणुका काढता येणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात आज मंत्रालय येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. साधेपणाने हा उत्सव साजरा करताना एक चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात ‘पुनःश्‍च हरिओम’ करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत.

पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकास ६ दिवसांची पोलिस कोठडी; घराची झडती सुरू!

त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ. यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा. त्याद्वारे जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

- सलून व्यावसायिकांनी घेतला मोठा निर्णय; काय आहे वाचा सविस्तर

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव अजोय मेहता, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल, मुंबई पोलिस आयुक्त परमविर सिंह, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर तसेच गणेश मंडळांचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

RTE : २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला; वाचा सविस्तर!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This years Ganeshotsav will be held without rally