
'मेड इन इंडिया' फेम अलिशा चिनॉय कुठे आहे,गाण्यापासून का राहते दूर?
मेड इन इंडिया..मेड इन इंडिया..मेड इन इंडिया...(Made In India) ९० च्या दशकात या गाण्यानं अनेकांना वेड लावलं होतं. १९९५ साली आलेल्या या गाण्याला अलिशा चिनॉयनं(Alisha Chinai) गायलं होतं. या गाण्यामुळे अलिशा रातोरात स्टार गायिका बनली होती. अलिशाच्या गाण्यामुळे लोकं तिला 'क्वीन ऑफ इंडीपॉप' म्हणून संबोधू लागले होते. हिंदी म्युझिक इंडस्ट्रीत अलिशा चिनॉयच्या करिअरला त्यानंतर चांगली सुरुवात झाली,पण नंतर अचानक काय झालं माहित नाही, ती म्युझिक इंडस्ट्रीतून गायब झाली. चला जाणून घेऊया सध्या कुठेय अलिशा चिनॉय आणि काय करतेय? (27 years after ‘Made in India’, singer Alisha Chinai returns with single ‘Chamkegaa India’)
हेही वाचा: 'पठाण' मधील शाहरुखचा खतरनाक लूक समोर; रिलीजसाठी आजचा दिवसच का निवडला?
1965 मध्ये गुजरातच्या अहमदाबाद मध्ये जन्माला आलेल्या अलिशाचं खरं नाव आहे सुजाता चिनॉय. 1985 मध्ये तिचा पहिला अल्बम 'जादू' आला, परंतु तिला ओळख मिळाली ते 'मेड इन इंडिया' गाण्यामुळे. अलिशा चिनॉयच्या हिट गाण्यांची लिस्ट खूप मोठी आहे. तिच्या प्रत्येक गाण्याचा उल्लेख तर करता येणार नाही पण हो तिची 'दिल ये कहता है','डूबी डूबी','कांटे नहीं कटते','रुक रुक रुक' आणि 'कजरारे' अशी सुपरहिट गाणी आजही सगळ्यांच्या ओठांवर रुळत आहेत.
हेही वाचा: रश्मिकाची निर्मात्याकडे अजब मागणी; म्हणाली होती,'माझ्या कुत्र्याला...'
बोललं जातं की अलिशाला हिंदी इंडस्ट्रीत आणण्याचं श्रेय बप्पी लाहिरी यांना जातं. बप्पी दा सोबत मिळून तिनं अनेक हिट गाणी दिली आहेत. इतकंच नाही तर अनु मलिक सोबतही तिनं अनेक हिट गाणी दिली आहेत. अनु मलिक सोबत आलियानं 'इंडियन आयडॉल ३' आणि 'स्टार या रॉकस्टार' सारख्या रिअॅलिटी शो चं परिक्षक म्हणूनही काम पाहिलं आहे.
हेही वाचा: ‘मेल्याहून मेल्यागत’, सिद्धार्थ जाधव असं का म्हणतोय?
टी.व्ही वर अलिशा आणि अनु मलिक यांच्यातलं बॉन्ड चांगलं दिसायचं पण एक दिवस तिनं अनु मलिक विषयी धक्कादायक वक्तव्य करुन सगळ्यांनाच शॉक दिला होता. एका मुलाखतीत अलिशानं अनु मलिकला चक्क 'हैवान' म्हणून संबोधलं होतं. तसंच तिला चारचौघात कमी लेखण्याचा, तिला मागे पाडण्यासाठी कट केल्याचा देखील आरोप केला होता. पण अलिशाच्या या म्हणण्याला तेव्हा अनु मलिकनं फारसं महत्त्व दिलं नव्हतं म्हणून तो वाद तिथेच थंड पडला.
हेही वाचा: R Madhavan पडला वादात; म्हणाला,'पंचांग पाहून इस्रोनं मंगळावर पाठवलेलं यान'
अलिशा चिनॉयनं 1986 मध्ये आपला मॅनेजर राजेश झावेरीसोबत लग्न केलं होतं. 8 वर्षापर्यंत दोघांचं वैवाहिक आयुष्य ठिकठाक सुरु होतं,परंतु कोणाला या गोष्टीचा अंदाजा नव्हता की ती आपल्या नात्यात खूश नाहीय. 8 वर्षापर्यंत एक दुसऱ्यांची साथ देणाऱ्या राजेश आणि अलिशानं 1994 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला .
अलिशा चिनॉयचं प्रोफेशनल लाइफ सुरळीत सुरू होतं. परंतु,तेव्हाच तिच्या वडीलांना कॅन्सरने गाठलं. ती वडीलांच्या खूप जवळ होती. त्यामुळे तिनं सगळं सोडून फक्त वडीलांवर लक्ष केंद्रित केलं होतं. त्यामुळे ती इंडस्ट्रीतून जवळपास गायब झाली होती. पण आता अलिशा पुन्हा अनेक वर्षांनी 'चमकेगा इंडिया' गाण्यामधून पुन्हा म्युझिक इंडस्ट्रीत कमबॅक करीत आहे. अलिशाच्या नवीन गाण्याला Zee Music company नं त्यांच्या ऑफिशियल युट्युब चॅनलवर रिलीज केलं आहे. आता पहायचं इतक्या वर्षांनी अलिशाच्या गाण्याची जादू कायम आहे की नाही.
Web Title: 27 Years After Made In India Singer Alisha Chinai Returns With Single Chamkegaa
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..