आशुतोषचा भीषण अपघात, अरुंधती कासावीस.. होणार नव्या नात्याची सुरुवात.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aai kuthe kay karte : arundhati confess her love about ashutosh after his accident

आशुतोषचा भीषण अपघात, अरुंधती कासावीस.. होणार नव्या नात्याची सुरुवात..

Aai kuthe kay karte : स्टार प्रवाह (star pravah) वरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका खूप लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनिरुद्ध देशमुख,अरुंधती आणि संजना या त्रिकुटाला प्रक्षकांनी उचलून धरले आहे. यामध्ये सध्या आशुतोष हे नवीन पात्र आले आहे. आयुशतोष हा अरुंधतीचा शाळेतला मित्र आहे. त्यांचे अरुंधतीवर असलेले प्रेम तो जाहीर करतो पण अरुंधती मात्र तिच्या निर्णयांवर ठाम असते. आता या मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे.

हेही वाचा: 'आधी तुझ्या लेकीला आवर..' फराह खानचा चंकी पांडेला सल्ला..

आज अरुंधती आशुतोषमुळे स्वतःच्या पायावर उभी आहे. त्यांची मैत्री अधिक घट्ट होत असतानाच एक मोठा आघात अरुंधतीवर होणार आहे. त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये आशुतोष आणि नितीन घरी जात असताना त्यांचा अपघात होतो. गाडीसमोर आलेल्या व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात आशुतोष आणि नितीनचा अपघात होतो. गाडी भिंतीवर आपटते आणि आशुतोष कारबाहेर फेकला जातो.' असे यात दाखवण्यात आले आहे. (ashutosh accident in aai kuthe kay karte)

आशुतोषच्या अपघाताची बातमी मिळताच अरुंधती, आप्पा आणि यश हॉस्पिटलमध्ये धाव घेतात. तिथे नितीन हा घडलेला सगळा प्रसंग सांगतो. आशुतोषला खूप लागलं असून तो आयसीयूमध्ये आहे असे नितीन सांगतो. अरुंधती मात्र ठामपणे म्हणते, आशुतोषला काहीही होणार नाही. त्याच वेळी तिला आपलंही आशुतोषवर प्रेम असल्याची जाणीव होते. कारण गेली २६ वर्षे आशुतोष हा अरुंधतीवर प्रेम करत आला आहे. तिच्यासाठी त्याने लग्नही केले नाही. पण आता त्याच्या कठीण काळात त्याची साथ देताना अरुंधतीला प्रेमाची जाणीव होणार का, ती प्रेमाची कबुली देणार का याची उत्कंठा प्रेक्षकांना लागली आहे.

Web Title: Aai Kuthe Kay Karte Arundhati Confess Her Love About Ashutosh After His Accident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top