
आमिर खानचा मोठा निर्णय, आता तर....
Aamir Khan Comment On Lal Singh Chaddha : वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट लालसिंग चड्ढा बॉक्स ऑफिसवर इतका अपयशी ठरेल याचा प्रेक्षक, निर्मात्यांनी किंवा अभिनेता आमिर खाननेही विचार केला नसेल. रिलीजच्या २० दिवसांत केवळ ६० कोटी रुपये कमावल्याने आमिर आणि निर्माते दुखावले आहेत.
बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे अपयश निर्मात्यांसाठी मोठा धक्का आहे. पण वृत्तातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिर खानने (Ammir Khan) या चित्रपटाच्या फ्लॉपची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून त्याची फी न घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. आमिरने खरेच असे केले तर निर्मात्यांना किरकोळ नुकसानच सहन करावे लागेल.
त्यामुळे आमिर खान १०० कोटी फी घेणार नाही?
आमिर खानने 'लालसिंग चड्ढा'च्या (Lal Singh Chaddha) खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांची झालेल्या नुकसानीची जबाबदारी घेत आमिर खानने या चित्रपटाची पूर्ण फी न घेण्याचे ठरवले आहे. बातमीवर विश्वास ठेवला तर, असे करून आमिरला निर्मात्यांचे झालेले नुकसान भरून काढायचे आहे. (Bollywood News)
आमिरच्या फीबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटासाठी आमिर खान 100 कोटी फीस घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र निर्मात्यांना दिलासा देत आता ही रक्कम घेणार नाही, अशा बातम्या येत आहेत.
लालसिंग चड्ढाची एवढीच कमाई
गेल्या चार वर्षांपासून आमिर खानच्या चित्रपटाची प्रतिक्षा होती. आमिर खानला निर्मात्यांसह हा चित्रपट बनवायला चार वर्षे लागली, तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. हा चित्रपट एकूण १८० कोटी खर्चून बनवण्यात आला आहे. पण बॉक्स ऑफिसवर तो फक्त ६० कोटींची कमाई करू शकला.
मात्र, या चित्रपटाला परदेशात चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट फ्लॉप होण्यामागे अनेक कारणे होती, मग ती कथा असो किंवा बहिष्काराचा ट्रेंड, या दोन्ही कारणांमुळे चित्रपटाच्या व्यवसायाचे नुकसान झाले.