'तारक मेहता' मधून आता हॉट 'बबिता' घेणार एक्झिट? कारणही आलं चर्चेत Munmun dutta | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Munmun Dutta

'तारक मेहता' मधून आता हॉट 'बबिता' घेणार एक्झिट? कारणही आलं चर्चेत

'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak Mehta ka Ooltah Chashmah) ही मालिका प्रेक्षकांमध्ये सर्वात अधिक प्रसिद्ध असून गेली अनेक वर्ष या मालिकेतील कलाकारही घराघरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरले आहे. पण गेल्या काही दिवसांत या मालिकेसंदर्भात चाहत्यांना नाराज करणाऱ्या अनेक गोष्टी कानावर पडत आहेत. काही दिवसांपूर्वी तारक मेहता ही महत्त्वाची भूमिका करणारे शैलेश लोढा मालिकेतून एक्झिट घेत आहेत ही बातमी सर्वत्र पसरली असताना आता चाहत्यांमध्ये हॉट बबिता म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता(Munmun Dutta) या मालिकेला रामराम ठोकत आहे अशी बातमी देखील कानावर पडली आहे.

हेही वाचा: पृथ्वीराज चौहान राजपूत की गुर्जर राजा? अक्षयचा 'पृथ्वीराज' सापडला वादात

'तारक मेहता..' शो मध्ये मुनमुन दत्तानं साकारलेली बबिताची(Babita) भूमिका चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुनमुन दत्ताला देखील बबिता या व्यक्तिरेखेमुळे अधिक ओळख मिळाली आहे. आणि अशामध्ये ती मालिकेतून बाहर पडत आहे असं कळलं तर नक्कीच चाहते नाराज होतील.

हेही वाचा: '3 तास विमानात अडकून पडलो,मदतही मागितली पण..' एअरलाइनवर दिया मिर्झाचा आरोप

मीडियाला मिळालेल्या वृत्तानुसार मुनमुन दत्ताच्या प्रसिद्धिला पाहता बीग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनसाठी तिच्याशी संपर्क साधला गेल्याचं कळत आहे. त्यामुळे आता दावा केला जात आहे की जर मुनमुन दत्ता बिग बॉस ओटीटी मध्ये समिल होण्यासाठी होकार कळवते तर नक्कीच ती छोट्या पडद्यावरच्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध मालिकेला गूडबाय म्हणू शकते. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती कळालेली नाही.

हेही वाचा: रानबाजार:'30 सेकंदाचा 'तो' किसिंग सीन दिला कारण...';तेजस्विनीचा मोठा खुलासा

'बिग बॉस' शो चे आपण चाहते असाल तर नक्कीच आपण सर्वांनी 'बिग बॉस 15' मध्ये तिला पाहिलं असेल. या सीझनमध्ये बबिता दोन दिवसासाठी चॅलेंजर म्हणून शो मध्ये गेली होती. तिच्यासोबत नागिन सुरभी चंदन,आकांक्षा पुरी आणि विशाल पुरी ने देखील एन्ट्री घेतला होती. या सगळ्यांनी बिग बॉस शो मध्ये गेल्यावर कंटेस्टंट्सना खूप कठीण टास्क दिले होते.

हेही वाचा: 'अजुनही ही दुधखुळीच?'; केतकीची बाजू घेणाऱ्या पोंक्षेंना टिळेकरांचा सवाल...

बिग बॉसच्या घरातील दोन दिवसांच्या वास्तव्यात मुनमुन दत्तानं आपली चांगलीच छाप सोडली होती. आणि असं असताना जर का ती बिग बॉस ओटीटी मध्ये सामिल झाली तर ती या सिझनमध्ये धमाल आणेल यात शंकाच नाही. आता चाहते म्हणून आपल्या हातात फक्त एवढंच राहिल की मुनमुन दत्ता 'बिग बॉस ओटीटी' की 'तारक मेहता का उल्टा चष्मा', यापैकी कोणत्या शो ला प्राधान्य देते या तिच्या निर्णयावर लक्ष ठेवायचं.

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmahs Babita Ji Aka Munmun Dutta To Quit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top