'अजुनही ही दुधखुळीच?'; केतकीची बाजू घेणाऱ्या पोंक्षेंना टिळेकरांचा सवाल...

महेश टिळेकर यांनी लांबलचक पोस्ट लिहून केतकी संदर्भातले अनेक खुलासे करत शरद पोक्षेंनाही तिची बाजू घेतली म्हणून खडे बोल सुनावले आहेत.
Ketki Chitle  Controversy,Sharad Ponkshe v/s Mahesh Tilekar
Ketki Chitle Controversy,Sharad Ponkshe v/s Mahesh TilekarGoogle

निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर(Mahesh Tilekar) अनेकदा सामाजिक,राजकीय,मनोरंजन क्षेत्रासंबंधिक अनेक वादग्रस्त विषयांवर परखडपणे सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा माननीय शरद पवार(Sharad Pawar) यांच्या विरोधात वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे सध्या अभिनेत्री केतकी चितळे(Ketki Chitle) १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी अंतर्गत जेलची हवा खात आहे. केतकी चितळे प्रकरण भलतंच तापलंय. अजूनही यावरनं वादाचा भडका अधनं-मधनं उडताना दिसतो. केतकीची बाजू घेत अभिनेते शरद पोंक्षे(Sharad Ponkshe) यांनी तिच्या लहान वयाचा दाखला देत,तिला एक संधी द्यावी,त्याचं राजकारण करू नये अशा शब्दात आपली भूमिका मांडली होती. पण आता यावरुन महेश टिळेकरांनी शरद पोंक्षेंना चांगलंच सुनावताना लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

Ketki Chitle  Controversy,Sharad Ponkshe v/s Mahesh Tilekar
रानबाजार: 30 सेकंदाच्या किसिंग सीन मागची खरी गोष्ट; तेजस्विनीचा मोठा खुलासा

शरद पोंक्षेंनी केतकीची बाजू घेत म्हटलं होतं,''आपण सोशल मीडियावर काय शेअर करतो हे माहित असायला पाहिजे. केतकी अजूनही लहान मुलगी आहे. त्यामुळे तिला सुधारण्याची संधी मिळायला हवी असं मला वाटत. शरद पोंक्षे यांच्या या मतप्रदर्शनावर आता निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी त्यांना केतकी संदर्भात असलेल्या अनेक वादग्रस्त प्रकरणांचे दाखले देत प्रश्न विचारत पलटवार केला आहे''.

mahesh tilekar post image
mahesh tilekar post imageFacebook image

त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ''अजूनही ही दूधखुळी ?.. शारीरिक संभोग,जाती धर्म, जनतेचे आदर्श असणारे इतिहासातील महापुरुष, महामानव, अशा सर्वांवरच उघडपणे वादग्रस्त विधाने करून आणि तशा पोस्ट लिहून आपले अगाध ज्ञान पाजळणारी केतकी म्हणजे लहान मुलगी?''

''वयाच्या तिशीपर्यंत पोचलेल्या ह्या लहान मुलीने समाजात जाती जातींमध्ये तेढ निर्माण होईल आणि लोकांच्या भावना दुखावतील अशा पोस्ट लिहिल्या.तिला जाब विचारणाऱ्या तरुण तरुणींना शब्दांचे खेळ खेळत तिने उलटी उत्तरे दिली, जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली त्यावेळी ज्येष्ठ नट शरद पोंक्षे यांचे पित्त का उसळले नाही? वडीलधाऱ्या कलाकाराच्या नात्याने केतकीला आपली मुलगी मानून या ज्येष्ठ नटाने तिला समजावण्याचा का प्रयत्न केला नाही?आणि त्यांना जर मनापासून वाटतंय की, या लहान मुलीला सुधारण्याची संधी दिली पाहिजे तर शिक्षा मिळून जेलमध्ये जाऊनही अनेकजण सुधारतात.

Ketki Chitle  Controversy,Sharad Ponkshe v/s Mahesh Tilekar
'3 तास विमानात अडकून पडलो,मदतही मागितली पण..' एअरलाइनवर दिया मिर्झाचा आरोप

दीड वर्षापूर्वी तिने केलेल्या वादग्रस्त पोस्ट बाबत सायबर क्राईम आणि वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये मी कंप्लेंट केली. तिचा फोन स्विच ऑफ असल्यामुळे पोलिसांना तिला संपर्क करणे अवघड जात होते.तिला ओळखणाऱ्या काही मराठी कलाकारांना तिचा पत्ता विचारल्या वर काहींनी माहिती असूनही सहकार्य केले नाही आणि एका मराठी कलाकाराने तिची बाजू घेत जात मध्ये आणून उपदेश देण्याचा प्रयत्न केला तेंव्हा तो माझ्या मनातून उतरला. पण पोलिसांनी नंतर तिला संपर्क साधून नोटीस पाठवली त्यावेळी ती धावत पोलीस स्टेशन मध्ये आली आणि केलेल्या कृत्याबद्दल माफीनामा लिहून दिला. कागदपत्रांवर सही करताना स्वतः ची ओळख अभिनेत्री अशी न लिहिता सही खाली समाजसेविका असे तिनं लिहिलं.

Ketki Chitle  Controversy,Sharad Ponkshe v/s Mahesh Tilekar
पृथ्वीराज चौहान राजपूत की गुर्जर राजा? अक्षयचा 'पृथ्वीराज' सापडला वादात

समाजात जातींमध्ये द्वेष पसरविणारी मुलगी स्वतः ची ओळख समाजसेविका म्हणून दाखवते याची मला कीव आली. पोलिसी खाक्या बघून आता तरी ती सुता सारखी सरळ होईल असं वाटलं होतं पण काही महिन्यांनंतर पुन्हा उसळी मारून ही अबला समाजसेविका पुन्हा प्रकट झाली. सुधारण्याची संधी मिळूनही जी सुधारली नाही अश्या मुलीला, जातीचे लेबल लावून जर कुणी तिला सहानुभूती मिळण्यासाठी समर्थन देण्यासाठी एकत्र येत असतील तर समाजासाठी पण हे घातक आहे. हिच्या बद्दल सहानुभूती वाटणारे हेच लोक उद्या या अबला वाटणाऱ्या मुलीला पुरस्कार देऊन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करतील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तिला फुस लावण्याचं काम करून तिला मोठं करण्याचा प्रयत्न करतील अशी शंका वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com