
तोपर्यंत उर्फी काही लग्न करायची नाही..नेटकरीही झालेत थक्क
उर्फीच्या नावानंतर तीची कुठे चर्चा चालत असेल तर ती तीच्या आगळ्या वेगळ्या बोल्ड कपड्यांसाठी.उर्फी OTT बीग बॉसच्या शो मधून बाहेर पडणारी पहिलीच कंटेस्टंट होती.शो च्या बाहेर पडल्यानंतर या अभिनेत्रीने मात्र तीच्या फॅशन स्टाईलचा कहर करत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले .उर्फी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठीच बोल्ड कपडे घालत असते असा आरोपही तीच्यावर करण्यात आला होता.मात्र उर्फीच्या नवे रूप बघून नेटकऱ्यांना विश्वासच बसेना.असं काय परिधान केलं असेल तीने?
चित्र विचित्र कपडे घालणाऱ्या उर्फीला बघून नेटकरी सुरूवातीला हैराणच झाले.ही उर्फी असूच शकत नाही असे अनेकांचे म्हणणे पडले.अली सेठीच्या 'चांदणी रात' या गाण्यावर रिल व्हिडिओ पोस्ट केला आहे.या गाण्याच्या ती इतकी प्रेमात पडली आहे की जोपर्यंत हे गाणं माझ्या लग्नात लागणार नाही तोपर्यंत मी लग्नच करणार नाही असं तीने म्हटलंय.एका 'इफ्तार' पार्टीतील व्हिडिओ तीने पोस्ट केलाय.तीच्या या रिलमधे ती सलवार सूट मधे दिसते आहे.तीला असे आधी बघण्याची सवय नसलेले नेटकरी उर्फीला बघून आश्चर्यचकीतच झाले.
"मी हा व्हिडिओ का अपलोड केलाय माहिती नाही ,पण मी या गाण्याच्या प्रेमात पडलेय.ज्यांनी अली सेठीचं 'चांदणी रात' हे गाणं ऐकलं नाही.त्यांनी हे लवकऱ्यात लवकर ऐकावे आणि मग माझे आभार मानावे.त्याचबरोबर "हे गाणं जेव्हापर्यंत माझ्या लग्नात वाजणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही."असं तीने व्हिडिओच्या कॅप्शन मधे लिहिलंय.सलवार आणि डोक्यावर दुपट्टा घेतलेल्या उर्फीला कोणी 'ही उर्फी नाहीच'म्हणालेत.काहींनी तर 'आज पुर्ण कपड्यात कशी काय आली?' असेही कमेंट केले आहे.
Web Title: Actess Urfi Gave A Statement About Her Marriagefans Shock By Seeing Her In Salwar Kurta And
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..