आता काय बोलायचं,प्रसिध्द कलाकारानं चारवेळा केला आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 21 November 2020

अमित यांनी नुकतेच ब्रिथ नावाच्या एका वेब सीरीजमध्ये काम केले. त्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. तसेच यारा नावाच्या एका चित्रपटातही ते झळकले.

मुंबई - मनासारखं काही होत नसलं म्हणजे लगेच जीव संपवाय़ला निघणा-यांची संख्या काही कमी नाही. त्यात अनेक सेलिब्रेटींचाही समावेश आहे.

संघर्ष, कष्ट कुणाला काही चुकलेलं नाही. अशावेळी त्याला धैर्याने सामोरं जायचं सोडून लगेच हार मानणा-यांचीही संख्या समाजात कमी नाही. काही वर्षांपूर्वी काय पो चे नावाचा एक चित्रपट आला होता. त्यातील कलावंतानं त्याला आलेल्या नैराश्याविषयी सविस्तपणे सांगितले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AMIT SADH (@theamitsadh)

अमित साध यांनी एक दोन वेळा नव्हे तर तब्बल चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब ही त्यांनीच उघड केली आहे. सुशांत सिंग बरोबर त्यांनी काय पो चे मध्ये काम केले होते. 

‘बदला लेना मजबुरी नहीं, जरुरत बन गई है’, राजीव खंडेलवालची ‘नक्षलबारी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अमित यांनी नुकतेच ब्रिथ नावाच्या एका वेब सीरीजमध्ये काम केले. त्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. तसेच यारा नावाच्या एका चित्रपटातही ते झळकले. आपण वय वर्षे 16 ते 18 दरम्यान असताना आपल्या मनात येणा-या नैराश्याच्या विचारांमुळे आपण 4 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

हे ही वाचा: पुन्हा एकदा हॉलिवूडपटात ‘देसीगर्ल’ची वर्णी, ‘वी कॅन बी हिरोज’चा टीझर रिलीज    

अमित यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. भीती आणि आत्सविश्वासाचा अभाव असल्याने त्याची जागा नकारात्मक विचारांनी घेतली. यामुळे मनात नको ते विचार यायचे. समोर येणा-या आयुष्याला तोंड देण्यासाठी पुरेसं मनोबल एकवटण्यासाठी मला प्रयत्न करावा लागला.

हे ही वाचा: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीची छापेमारी    

मात्र याप्रकारच्या परिस्थितीवर मात करण्याकरिता मला खूप वेळ वाट पाहावी लागली. 20 वर्षे थांबावे लागले. आता एक कळुन चुकले आहे ते म्हणजे, अशी परिस्थिती हा काही शेवट नाही. हेही दिवस निघून जातील हे लक्षात घ्यायला हवे.

आता माझ्यात खूप फरक पडला आहे. मी आता सकारात्मक पध्दतीने विचार करायला लागलो आहे. एक महत्वाकांक्षी व्यक्ती होण्याच्या दिशेनं माझा प्रवास सुरु झाला आहे.

काही झालं तरी हार मानु नका हे मला सर्वांना सांगायचे आहे. कित्येकांना अपयश सहन न झाल्यामुळे त्यांनी मरण जवळ केले आहे. त्यांनी आपल्या आत डोकावून पाहण्याची गरज असल्याचे अमित यांनी यावेळी सांगितले. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor Amit Sadh attempted suicide four times