Ajay Sudeep Controversy: जावेद जाफरीनं ओतलं तेल, अजयचं ते वक्तव्य म्हणजे...| Actor Javed Jaffrey Hindi language | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajay Devgn - Sudeep contraversy

Ajay Sudeep Controversy: जावेद जाफरीनं ओतलं तेल, अजयचं ते वक्तव्य म्हणजे...

Ajay Devgn Kiccha Sudeep Controversy - बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा त्याच्या हिंदी भाषेवरुन केलेल्या वक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्यानं त्याच्या रन वे 34 या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान देशाची राष्ट्रभाषा ही हिंदीच आहे (Hindi National Language) असं विधान केलं होतं. त्यावर टॉलीवूडच्या अभिनेत्यानं सुदीप किच्चानं शेरेबाजी करत अजयला डाफरलं होतं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी देखील सुदीपची बाजु घेत अजयवर टीका केली होती. त्यानंतर मनोरंजन विश्वामध्ये बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड (Bollywood Vs Tollywood) असा वाद रंगला होता. त्यामध्ये बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी (bollywood news) अजयच्या बाजुनं काहींनी त्याच्याविरोधात प्रतिक्रिया दिल्या. आता यासगळ्यात प्रसिद्ध अभिनेते जावेद जाफरी यांनी याप्रकरणावर टिप्पणी केली आहे.

जावेद जाफरी यांचे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या परखड प्रतिक्रियेसाठी जावेद जाफरी ओळखले जातात. त्यांनी म्हटलं आहे की, अजय प्रमाणे मलाही वाटत होते की, हिंदीच आपल्या देशाची राष्ट्रभाषा आहे. एका इंग्रजी मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद जाफरी यांनी राष्ट्रभाषा प्रकरणवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आपल्या संविधानानुसार कोणतीही एक भाषा आपल्या सर्वांसाठी नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवे. आपल्या संविधानानं एका भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. आपण देशाची विविधता आणि त्यातील सौंदर्यही लक्षात घ्यायला हवे. अजयनं ज्यावेळी तसे विधान केले तेव्हा मलाही तिच भाषा राष्ट्रभाषा असल्याचे वाटले होते.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

आतापर्यत बॉलीवूड - टॉलीवूडमधून अनेक सेलिब्रेटींनी हिंदी राष्ट्रभाषा प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्याचे दिसून आले आहे. कंगना रनौत, सोनु निगम, मनोज वाजपेयी, सोनु सूद यांनी याप्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र हा वाद अजुनही सुरु असल्याचे सोशल मीडियावरील दिसत आहे. जावेद जाफरी यांच्या वर्क फ्रंटविषयी सांगायचे झाल्यास तो सैफ अली खान आणि अर्जुन कपूर यांच्या भूत पोलीसमध्ये दिसले होते. याशिवाय ते मोहा - जादुगरमध्ये वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

हेही वाचा: Viral Video:आलिशान कारमधे फिरणारी नोरा नटून थटून स्कूटरवर का गेली?

Web Title: Actor Javed Jaffrey Hindi Language Controversy Ajay Devgn Tollywood Actor Sudeep Kitchen Interview

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top