एकेकाळी कार्तिकही कुणाचा फॅन होता माहीत आहे ? मग वाचा सविस्तर...

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 2 July 2020

कार्तिक आर्यन मध्य प्रदेशातून मुंबईत शिक्षणासाठी आला. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील  शिक्षण संस्थेत तो इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मॉडेलिंग करीत होता आणि चित्रपटदेखील पाहात होता.

मुंबई : कार्तिक आर्यन मध्य प्रदेशातून मुंबईत शिक्षणासाठी आला. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील  शिक्षण संस्थेत तो इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मॉडेलिंग करीत होता आणि चित्रपटदेखील पाहात होता. त्याला चित्रपटात पहिली संधी मिळाली ती सन 2011 मध्ये आलेल्या 'प्यार का पंचनामा' या चित्रपटाद्वारे. त्यानंतर तो एकापाठोपाठ एक चित्रपट करू लागला. 

आता सुट्या पैशांची कटकट मिटली! बसमध्ये टिकीट घेतांना वापरा 'ही' पेमेंट पद्धत

'सोनू के टीटू की स्विटी' या चित्रपटाद्वारे त्याला स्टारडम मिळाले. आज बॉलिवूडमधील तो स्टार असला तरी एकेकाळी त्याला खूप स्ट्रगल करावा लागला होता. आता त्याचा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवास उत्तम सुरू झाला आहे. आज त्याच्यावर कित्येक मुली फिदा आहेत. त्याच्याबरोबर एक सेल्फी मिळावा म्हणून त्या धडपडत असतात. त्याचा ऑटोग्राफ किंवा त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आटोकाट कित्येक जण प्रयत्न करीत असतात. 

थरथरत्या हाताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका,असू शकतो 'हा' मेंदूचा गंभीर आजार

परंतु तब्बल बारा वर्षापूर्वी कार्तिकदेखील सेलिब्रेटींबरोबर फोटो काढण्यास खूप आसुसलेला होता. कित्येक सेलिब्रेटींचा तो फॅन होता. किंग खानचा अर्थात शाहरूखचा तो निस्सीम चाहता होता. त्याचे चित्रपट तो आवर्जुन पाहात होता. त्याला भेटण्याची त्याची तीव्र इच्छा होती. एखाद्या सेलिब्रेटींचा फोटो काढावा आणि त्याच्याशी संवाद साधावा असे तेव्हा त्याला वाटत होते. त्यासाठी त्याने अनेक प्रयत्नदेखील केले. 

मुंबई विमानतळाच्या कामात मोठा गैरव्यवहार उघड; जीव्हीकेच्या अध्यक्षासह 'इतके' जण सीबीआयच्या रडारवर...

सन 2008 मध्ये मुंबई मॅरेथॉन पाहण्यासाठी तो गेला होता. तेथे  त्याने बॅरिेकेट्सवरून उडी मारून प्रीती सबरवालबरोबर फोटो काढला होता. तिच्याशी दोनेक मिनिट संवादही साधला आणि त्याने तिला सांगितले होते की, 'हाय...शाहरूख खानला माझा हाय सांगा', असेही म्हणाला होता. आज त्याने तो फोटो सोशल मीडियावर टाकला आहे आणि आपल्या जुन्या आठवणी जाग्या केल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor karthik aryan shares his memory about he was fan of srk