बड्डे बॉय मिथूनची पोलिसांकडून चौकशी; प्रक्षोभक भाषणाचा आरोप

बड्डे बॉय मिथूनची पोलिसांकडून चौकशी; प्रक्षोभक भाषणाचा आरोप

कोलकाता: अभिनय क्षेत्रातून नुकतंच राजकीय क्षेत्रात पदार्पण केलेल्या मिथून चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये आता वाढ होणार आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारादरम्यान मिथून चक्रवर्तीच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कोलकाता पोलिसांनी आज त्यांची चौकशी केली आहे. त्यांच्या या वादग्रस्त भाषणाच्या विरोधात मानिकलता पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Actor Mithun Chakraborty Kolkata Police controversial speech West Bengal polls FIR Maniktala speech)

ही एफआयआर रद्द करण्याची मागणी करत मिथून चक्रवर्तीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी हायकोर्टाने पोलिसांना मिथून चक्रवर्तीची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. या संदर्भातच पोलिसांनी आज व्हर्च्यूअल पद्धतीने त्यांची चौकशी केली. पश्चिम बंगालमध्ये अलिकडेच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिथून चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस विरोधात वक्तव्ये केली होती. त्यांनी प्रचारसभेत म्हटलं होतं की, मी एक नंबरचा कोब्रा आहे. डसलो तर तुम्ही फोटो बनाल. त्यांनी पुढे म्हटलं होतं की, मी गरीबांची लढाई लढू इच्छितो.. त्यांनी म्हटलं होतं की, मी राजनीती नाही तर मनुष्य नीती करतो.

बड्डे बॉय मिथूनची पोलिसांकडून चौकशी; प्रक्षोभक भाषणाचा आरोप
चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!, शेलारांचा ठाकरे सरकारवर प्रहार
बड्डे बॉय मिथूनची पोलिसांकडून चौकशी; प्रक्षोभक भाषणाचा आरोप
मराठा आरक्षणासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा; शाहू महाराज

प्रक्षोभक भाषणामुळे एफआयआर

7 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मिथून चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मिथून चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात एकामागे एक वक्तव्य करत राजकीय वातावरण चांगलेच तापवले होते. त्यांच्या याच वक्तव्यांनंतर टीएमसीने पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला होता.

मिथून चक्रवर्तींचा आज वाढदिवस

मिथून चक्रवर्ती यांचा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियावर लोक त्यांना सदिच्छा देत आहेत. तर दुसरीकडे कोलकाता पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पोलिस त्यांच्या त्या वक्तव्यांची चौकशी करत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस त्यांच्यावर कारवाई देखील करु शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com