esakal | 'लग्न झालं,दुस-या दिवशी सेटवर हजर होतो'
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Namit Das shared a fond memory from his small screen days

छोट्या पडद्यापासून सुरुवात करणा-या नमितला आपले ध्येय गाठण्यासाठी धडपडावे लागले. त्याने नुकतेच एका वृत्तवाहिनीला वर्ल्ड टेलिव्हिजन डे च्या निमित्ताने त्याने काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.

'लग्न झालं,दुस-या दिवशी सेटवर हजर होतो'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - ठराविक कलाकारांची मक्तेदारी मोडून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे जे काही अभिनेते आहेत त्याच नमित दासचे नाव घ्यावे लागेल. मेहनती, जिद्द आणि चिकाटीने वेगळं स्थान निर्माण करणा-या नमितचे नाव आता प्राधान्य क्रमाने घेतले जाते. सुरुवातीला काही चित्रपटांमधून दिसणारा नमितला पुढे वेबसीरीज मधून संधी मिळाल्याने तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र सध्या सगळ्यांच्या आवडीस पात्र होण्यापूर्वी त्याचा प्रवास खडतर असल्याचे त्याने सांगितले.

छोट्या पडद्यापासून सुरुवात करणा-या नमितला आपले ध्येय गाठण्यासाठी धडपडावे लागले. त्याने नुकतेच एका वृत्तवाहिनीला वर्ल्ड टेलिव्हिजन डे च्या निमित्ताने त्याने काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी तो म्हणाला, मला काही फार सहजासहजी कुठेही काम मिळालं नाही. त्यासाठी कित्येकांना विनंती करावी लागली. फिरावे लागले.

'भारती आता कसं वाटतयं',नेटक-यांनी उडवली टर

परिश्रम घ्यावे लागले. यात अनेकदा अपयश आले. मात्र माघार घेतली नाही. मिळेल ते काम करत राहिलो. ती त्यावेळची गरजही होती. यावेळी नमितने आपल्या 'सुमित संभाल लेंगा'  या मालिकेची सर्वांना आठवण करुन दिली. त्याने मालिकेत सुमितची भूमिका केली होती.आपल्या जबाबदारीची जाणीव असतानाही दरवेळी चुकत जाणा-याची भूमिका त्याने केली होती. त्या भूमिकेला रसिकांनी डोक्यावर घेतले होते. कौतूक केले होते.

Bandish Bandits Review: 'जुनं ते सोनं म्हणून ते हवं' असा अट्टाहास असणारी 'बंदिश बँडिट'!

नमितने या मालिकेतल्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, मला सुरुवातीला जी मालिका मिळाली तेव्हा नुकतेच माझे लग्न झाले होते. पण मी लग्नाच्या दुस-या दिवशी मालिकेच्या सेटवर हजर होतो. यासाठी मला माझ्या पत्नीचे आभार मानायला हवेत. तिने दाखवलेल्या समजूतदारपणाचा उपयोग झाला. मधुचंद्रासाठी आम्हा दोघांनाही वाट पाहावी लागल्याचे नमितने सांगितले.

मी ज्यावेळी टेलिव्हीजनवर काम करत होतो ते दिवस अगदी भारी होते. ते आठवले की मी भावनिक होतो.त्यावेळचा संघर्ष डोळ्यासमोर उभा राहतो. काही झालं तरी कष्ट करण्यास कचरायचे नाही हे ठरवले होते. तेव्हा आपल्याला यापुढील संघर्ष मोठ्या ताकदीवर उभा करायचा आहे हे लक्षात आले होते. आणि मी त्यादृष्टीने तयारीही सुरु केली होती.अभिनयाचा सतत सराव करत राहणे हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचे होते. ते मी केले. याचा फायदा मला पुढे मालिका आणि चित्रपटात करताना झाला.

बॉलिवूड सोडलेल्या अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न; पाहा VIDEO​

15 फेब्रुवारी 2015 मध्ये नमितने श्रृती व्याससोबत लग्न केलं. मुलाखती दरम्यान नमित टेलिव्हिजनच्या आठवणीत रमला.महाविद्यालयात असल्यापासून मी अभिनय करायला सुरुवात केली. मला झी टीव्हीने पंचम या मालिकेतून ब्रेक दिला. त्याचा मला फायदा झाला. त्या मालिकेने मला कॅमेरासमोर अभिनय कसा करायचा असतो याचे प्रशिक्षण दिले. हे सांगायला हवे. त्या मालिकेचे मी एकुण 148 भाग केले. याचे कारण म्हणजे त्यावेळी माझे महाविद्यालयाचे शेवटचे वर्ष असल्याने अभ्यासासाठी मला काही काळ ब्रेक घ्यावा लागला. नमितनं आतापर्यत माफिया, आर्या आणि सुटेबल बॉय सारख्या मालिकांमधून काम केलं आहे.