esakal | फटाक्याच्या बॉक्सवर परिणीतीचा फोटो, नेटक-यांकडून झाली ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Parineeti Chopra reacts fan teases her about endorsing crackers

 फटाक्याच्या बॉक्सवर प्रसिध्द झालेल्या फोटोला परिणीतीने इतकं काही सिरियस घेतलेलं नाही. सोशल मीडियातून ते फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. मात्र त्याकडे तिनं दुर्लक्ष केलं.

फटाक्याच्या बॉक्सवर परिणीतीचा फोटो, नेटक-यांकडून झाली ट्रोल

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फटाके तयार करणारी कंपनी अनेक सेलिब्रेटींचे फोटो त्यावर लावते. बॉलीवूडमधल्या एका अभिनेत्रीचा असाच एक फोटो सोशल मीडियातून समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटी हे प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करा असे सांगत आहे. यावर अभिनेत्री परिणीती चोप्रानेही त्या गोष्टीचे समर्थन केलं आहे. तिने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.

फटाक्याच्या बॉक्सवर प्रसिध्द झालेल्या फोटोला परिणीतीने इतकं काही सिरियस घेतलेलं नाही. सोशल मीडियातून ते फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. मात्र त्याकडे तिनं दुर्लक्ष केलं. एक दोन दिवसांपासून परिणीतीचा फटाक्याच्या बॉक्सवर झळकलेला फोटो शेयर होताना दिसत आहे. अखेर तिनं चाहत्यांना त्यावर एक गंमतीशीर उत्तर दिलं आहे.

त्याचं झालं असं की, ज्या फटाक्याच्या बॉक्सवर तिचा फोटो प्रसिध्द झाला आहे त्यावर एका चाहत्याने तु फटाक्यांचे समर्थन केलं आहे हे माहिती नव्हतं. अशी गंमतीदार कमेंट दिली आहे. याला प्रत्युत्तर देताना परिणीताने मिश्किल टिप्पणी केली आहे. ती म्हणाली, असे जरी असलं तरी तुम्ही काळजी घ्यायला हवी. फटाके वाजवून प्रदुषणात भर पडणार नाही याची काळजी घ्या. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. ते जास्त महत्वाचे आहे.

हिला तर बरोबर घेऊनच जाणार;बिग बॉस मधलं 'लव बर्ड'

परिणीताने चाहत्यांना उत्तर देताना #PollutionFree #SayNoToCrackers यांचाही वापर केला आहे. केवळ परिणीताच नव्हे तर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हे फटाक्यांचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत. परिणीचा फोटो फ्लॉवर पॉटच्या प्रकारातील फटाक्याच्या बॉक्सवर असल्याने तिला ट्रोल करण्यात आले आहे. तिने मात्र अशाप्रकारचे फटाके न फोडण्याचे आवाहन लोकांना केलं आहे.

अक्षय कुमार ‘राम सेतू’ च्या वाटेवर; 'लक्ष्मी' पावली

परिणीता सध्या आपला 32 वाढदिवस साजरा करण्यासाठी युरोपला गेली आहे. तिनं तेथील काही सुंदर फोटो आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेयर केले आहेत. तिने नुकतेच एका पार्कमधील हिरवळीवर बसलेला फोटो शेयर केला आहे. त्याला चाहत्यांनी लाईक केले आहे.

'दिशा खूप चांगली मुलगी आहे. बाकी गोष्टींवर सध्या काही बोलणार नाही’

भारताची प्रसिध्द बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात परिणीता मुख्य भूमिका करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा फोटो लुक प्रसिध्द झाला होता.या चित्रपटासाठी परिणीता खूप मेहनत घेत आहे. सायनानेही परिणीतीच्या त्या लुकची प्रशंसा केली होती. “My lookalike.” या शब्दांत तिने परिणीताचे कौतूक केले होते.