
बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये एक वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री पाहायला मिळते आहे. यंदाच्या सीझनमध्ये एजाज आणि पवित्रा यांच्या मैत्रीबद्दल सगळीकडे चर्चा आहे.
मुंबई - बिग बॉस शो हा त्याच्यातील गॉसिपमुळे जास्त चर्चेत येत असतो. मात्र यंदाचा 14 वा सीझन हा मात्र या शो मधील प्रेमप्रकरणांमुळे फोकस झाला आहे. त्यात सहभागी असणा-या वेगवेगळ्या स्पर्धकांनी यापूर्वी आपआपल्या गर्लफ्रेंडची नावे जाहिर केल्याने बिग बॉस सध्या लव बर्ड शो म्हणून प्रसिध्दीस येत आहे.
तसं पाहिलं गेल्यास बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये एक वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री पाहायला मिळते आहे. यंदाच्या सीझनमध्ये एजाज आणि पवित्रा यांच्या मैत्रीबद्दल सगळीकडे चर्चा आहे. सध्या हे दोघेही शो च्या दरम्यान एकमेकांना वेळ देत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यात चांगले ट्य़ुनिंग जमल्याचे बोलले जात आहे.
एजाजला पवित्रा आवडत असल्याचे त्या दोघांच्या वागण्या बोलण्यावरुन दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील वाढता दुरावा हा कमी होत आहे. यापूर्वी फराहने त्यांच्यातील आपआपसांतील बेबनाव कमी केला होता. त्यांची समजूत घालून त्यांना एकत्र आणले होते.
दिशाचा बिकनी लुक व्हायरल, टायगरची आई म्हणे, ‘वाह दिशू’
आता सध्या एजाज आणि पवित्रा हे यंदाच्या बिग बॉस 14 च्या सीझनचे लव बर्ड आहे. त्यांच्या बोलण्यात गोडवा आला आहे. ते दोघेही एकमेकांना समजून घेत आहे. ज्या चॅनेलवरुन ही मालिका सुरु आहे त्यात एजाज आणि पवित्रा पुनिया यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे दिसून आले आहे.
अक्षय कुमार ‘राम सेतू’ च्या वाटेवर; 'लक्ष्मी' पावली
नुकताच प्रदर्शित झालेल्या एका प्रोमोमध्ये एजाजने पवित्राला विचारले की, तु खरोखर अजूनही सिंगल आहेस का यावर पवित्राने मोठ्या प्रेमाने त्याला हो असं उत्तर दिलं. त्यावेळेपासून दोघांमधील केमिस्ट्री चर्चेत आली आहे.
'दिशा खूप चांगली मुलगी आहे. बाकी गोष्टींवर सध्या काही बोलणार नाही’
बिग बॉस मधील हे दोन्ही लव बर्ड एका बागेत वेळ घालवताना दिसत आहे. तसेत आपआपसांत गोडगोड गप्पा मारत आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या आहेत.गेल्या काही दिवसांपासून गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्याही अफेअर विषयी चर्चा रंगली होती. दिशा बरोबरच्या नात्याचा राहुलने सोशल मीडियावर खुलासा केला होता. त्यालाही मोठी प्रसिध्दी मिळाली होती.