डॉक्टर्स डे निमित्त रितेश-जेनेलिया यांनी घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या काय म्हणाले ते...

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 1 July 2020

1 जुलै हा सर्वत्र डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने आज अनेक कलाकारांनी डॉक्टरांना थँक यू  म्हणण्यासाठी व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले.

मुंबई : 1 जुलै हा सर्वत्र डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने आज अनेक कलाकारांनी डॉक्टरांना थँक यू  म्हणण्यासाठी व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले. पण या सगळ्यात जेनेलियाचा व्हिडिओचे खूप कौतुक होत आहे.

सावधान! कोरोनाचे संकट होणार गडद; डिसेंबरपर्यंत देशातील 'इतके' कोटी लोकसंख्या होणार कोरोनाबाधित... 

बुधवारी राष्ट्रीय डॉक्टर दिनी जेनेलिया आणि रितेश देशमुख यांनी त्यांच्या व्हिडिओतून आपण अवयवदान करत असल्याचे त्यांनी जाहीर केले आणि लोकांना अवयवदान करण्याचे आवाहनही केले. जेनेलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा आणि रितेशचा हा व्हिडिओ पोस्ट केला.

मुंबईकरांनो सावधान! जुलै महिन्यातील आठ दिवस धोक्याचे; प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा..

व्हिडिओमध्ये या दोघांनी सांगितले की, दोघांनीही आयुष्यातील सर्वात मोठी देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे.  जेनेलियाने व्हिडीओला कॅप्शन देत म्हटले आहे की, "रितेश  आणि मी बऱ्याच काळापासून एक विचार करत होतो. परंतु दुर्दैवाने आत्तापर्यंत ते करणे शक्य झाले नाही. आज डॉक्टर दिनाच्या दिवशी आम्ही आमच्या अवयवांचे दान करण्याचा संकल्प करत आहोत. 

खाकी वर्दीची तत्परता ! एक ट्विट अन् 'त्या' व्यक्तीच्या मदतीसाठी पोलिस धावून गेले

आम्हाला प्रेरणा देण्याकरिता आम्ही डॉ. नोझर शेअरी आणि एफओजीएसआयचे आभार मानू इच्छितो. तुम्ही एखाद्याला जी सर्वात मोठी भेट देऊ शकता ती म्हणजे 'जीवनाची देणगी'. आम्ही आपणा सर्वांना विनंती करतो की यात सहभागी व्हा आणि जीव वाचवण्याचे वचन द्या आणि तुमच्या अवयवांचे दान करण्याची प्रतिज्ञा करा."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor riteish deshmukh and genelia deshmukh decided to donate organ amid doctors day