सावधान! कोरोनाचे संकट होणार गडद; डिसेंबरपर्यंत देशातील 'इतके' कोटी लोकसंख्या होणार कोरोनाबाधित... 

corona
corona

मुंबई : देशातील तीन महिन्यापासून लॉकडाऊन कायम असतानाही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत आहे. कोरोनाचा संसर्ग कधी कमी होईल, हे अद्यापही स्पष्ट नसले तरी खबरदारी घेणे महत्वाचे आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर, गर्दीच्या ठिकाणी न जाणे आदी काळजी घेतली तरच कोरोनापासून स्वतःचा बचाव करता येणार आहे. मात्र, असे असतानाही कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची कोणतीही शक्यता नसून वर्षा अखेरपर्यंत देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या कोरोना बाधित होणार असल्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ऍण्ड न्यूरोसायन्स म्हणजेच 'निमहंस'ने आपल्या अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार डिसेंबर 2020 अखेरपर्यंत देशातील 67 कोटी जनता ही कोरोनाबाधित होणार आहे.

'निमहंस'च्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभ्यासानुसार, बाधित होणाऱ्या लोकसंख्येपैकी 90 टक्के लोकांना कोणतीही लक्षणे जाणवणार नाहीत. त्यामुळे ते आपल्या आजाराविषयी अनभिज्ञ असतील. जोपर्यंत त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे येणार नाहीत, तोपर्यंत त्यांना या आजाराविषयी कळणार नाही, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यातील केवळ 5 टक्के लोकं ही गंभीर असतील. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल. देशातील 67 कोटी लोकांपैकी 5 टक्के याचा अर्थ 3 कोटी लोकं ही गंभीर आजारी असतील. असे असले तरी मृत्युदर हा 5  टक्क्यांच्यावर जाणार नाही. त्यामुळे 95 टक्क्यांहून अधिक लोकं ही कोरोनावर मात करून या आजारातून बरे होणार आहेत.

देशातील वैद्यकीय तसेच संशोधन विभागातील तज्ज्ञांनी जेव्हा कोरोना संसर्गाच्या 'पीक आवर' बाबत अभ्यास केला तेव्हा हा निष्कर्ष समोर आला. एखादा संसर्ग ज्यावेळी पसरतो त्यावेळी तो ठराविक वेळी आपल्या पूर्ण भरामध्ये येतो आणि त्यानंतर मग तो हळू हळू शांत होऊ लागतो. काही संशोधकांच्या अभ्यासानुसार, जुलैपासून कोरोना रुग्णांची संख्या जोर धरेल. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जुलैअखेर पासून कोरोनाचा जोर ओसरायला लागेल. इंटरनॅशनल रेटिंग एजन्सीच्या अहवालानुसार, नुसार कोरोनाचा सर्वाधिक जोर हा सप्टेंबर महिन्याच्या नंतरच बघायला मिळेल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असून अर्थव्यवस्थेचा दर 5 टक्क्यांनी घसरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आपण पुढे भेडणाऱ्या या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज असणे गरजेचे आहे. 

आज देशात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी केवळ 1.30 लाख बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे पुढे रुग्णालयांत कोरोना रुग्णांसाठी बेड्सचा तुटवडा भासणार आहे. देशातील काही भागात हे चित्र बघायला मिळत असून ग्रामीण भारतात मोठी विदारक परिस्थिती येण्याची शक्यता आहे. देशातील ग्रामीण भागात मार्च 2019 पर्यंत केवळ 16,613 प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था होती. त्यातील केवळ 6,733 आरोग्य केंद्र 24 तास व्यवस्थित काम करतात. तर त्यातील 12,760 आरोग्य केंद्रांमध्ये केवळ चारच बेड्स आहेत. ग्रामीण भारतात सामुदायिक आरोग्य केंद्राची तर अतिशय वाईट स्थिती असून आजमितीस केवळ 5,335 केंद्र उपलब्ध आहेत.

देशात 16 मेपर्यंत देशातील एकूण रुग्णांपैकी 21 टक्के रुग्ण हे ग्रामीण जिल्ह्यांतील होते. याचा अर्थ 3.5 कोटी लोकांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे दिसणार असून त्यातील 70 लाख लोकं ही ग्रामीण भागातील असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com