शक्ति कपूरचा मुलगा पाहिला?: फॅन्स म्हणे हे केव्हा घडलं...

- बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय व्हिलन म्हणून अभिनेता शक्ति कपूर प्रसिद्ध आहे.
शक्ति कपूरचा मुलगा पाहिला?: फॅन्स म्हणे हे केव्हा घडलं...

मुंबई - बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय व्हिलन म्हणून अभिनेता शक्ति कपूर प्रसिद्ध आहे. आजवर बॉलीवूडमध्ये जेवढे व्हिलन झाले तेवढ्यात काकणभर प्रसिद्धी शक्ती कपूरच्या वाट्याला आली. त्यानं आपल्या अभिनयानं सर्वांची लक्ष वेधून घेतलं होतं. केवळ खलनायक म्हणून नाही तर कॉमेडियन, कधी नायक म्हणूनही शक्ती कपूरनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्याचं कॉमेडीचं टायमिंग अफलातून होतं. शक्ति कपूर यांना एक मुलगी आहे तिचं नाव श्रद्धा कपूर असं आहे. हे सर्वांना माहिती आहे. मात्र त्यांचा मुलगा सिद्धांत कपूर हा फार कमी वेळा सोशल मीडियावर दिसून आला आहे. आता शक्ति कपूर यांनी त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्या फोटोंना वेगवेगळ्या प्रकारच्या गंमतीशीर प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

एकीकडे बॉलीवूडमध्ये श्रद्धानं मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. दुसरीकडे सिद्धांतनं देखील आपल्या नावाची क्रेझ निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अजून अनेकांना सिद्धांत कपूर कोण आहे हे माहिती नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेकांनी हे कधी झालं, असा गंमतीशीर प्रश्न विचारला आहे. शक्ति कपूर यांना एक मुलगाही आहे हे अनेकांना माहिती नसल्याचे यानिमित्तानं समोर आलं आहे. शक्ति कपूर हे सोशल मीडियावर फारसे अॅक्टिव्ह नसले तरी ते वेगवेगळ्य़ा रियॅलिटी शो मध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले. मात्र ते नेहमी सिद्धांतला प्रमोट करण्याची संधी सोडत नाही. विशेषत ते गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींनी आपल्या मुलांना लाँच करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनीच मुलांचे प्रमोशनही सुरु केले आहे. यात काही नावं सांगायची झाल्यास परेश रावल, जावेद जाफ्री, चंकी पांडे यांचा समावेश आहे. यापैकी परेश रावल यांच्या मुलाचा बम्ब फाड नावाचा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

सिद्धांत कपूर (Siddhant Kapoor) अजून बॉलीवूडमध्ये आला नसला तरी त्याचा त्या दृष्टीनं प्रयत्न सुरु आहे. त्यानं यापूर्वी वेगवेगळ्या शो मध्ये सहभाग घेतला आहे. काही रियॅलिटी शो मध्ये देखील त्यानं उपस्थिती लावल्याचे दिसून आले आहे. स्टार किड असला तरी सिद्धांतनं त्याच्या करिअरला सुरुवात एक असिस्ंटंट दिग्दर्शक म्हणून केली आहे. त्यानं असिस्टंट दिग्दर्शक म्हणून भूल भुलैय्या, भाग - भाग, चूप चूप के, ढोल सारख्या चित्रपटांमधून काम केलं आहे. जे प्रेक्षकांना आवडलं आहे. सिद्धांतनं शूट आऊट वडालातून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तो अनुराग कश्यर यांच्या सायकोलॉजिकल थ्रिलर अगलीमध्ये दिसला होता.

शक्ति कपूरचा मुलगा पाहिला?: फॅन्स म्हणे हे केव्हा घडलं...
डोक्यावर ड्रम घेऊन दारु आणायला निघाला शक्ति कपूर, पाहा व्हिडीओ 
शक्ति कपूरचा मुलगा पाहिला?: फॅन्स म्हणे हे केव्हा घडलं...
सोनमला निर्लज्ज म्हणणाऱ्याला अनिल कपूर यांचं विनम्रतेने उत्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com