राज ठाकरेंच्या भोंग्यावर सोनू सुदची प्रतिक्रिया, म्हणाला.. | sonu sood on raj thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonu Sood replied to Raj Thackeray's statememt..'we should give importance to major issues in society'

राज ठाकरेंच्या भोंग्यावर सोनू सुदची प्रतिक्रिया, म्हणाला..

अनेक दिवसांपासून चाललेल्या भोंग्याच्या वादाने आता समाजात आक्रमक रूप घेतले आहे.नमाज आणि हनुमान चालीसाच्या वादाच्या अनुषंगाने सुरू झालेल्या या मुद्द्याने धार्मिक असमानता निर्माण केलेली दिसते.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे वादावरून परत एकदा राज्य सरकारला ईशारा दिला आहे."एका दिवसापूरतं हे आंदोलन नाही.आमचं आंदोलन सुरूच राहाणार.जेव्हापर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले जाणार नाही."असं राज ठाकरे(Raj Thackeray)बोललेत.त्यांच्या या वक्तव्यावर आता अभिनेता सोनू सूदही बोलताना दिसतोय.

नेमकं काय म्हणाला सोनू सूद ?

"धर्म,जात यातून बाहेर पडलो तरच देशाचा विकास होईल.देशातील जनतेनं एकत्र येणं महत्वाचं आहे.जी ताकद हनुमान चालीसामधे आहे तीच ताकद नमाजमधेही आहे.(Loud Speaker)हनुमान चालीसा जेवढी चांगली वाटते ऐकायला तेवढच नमाजही ऐकायला चांगलं वाटतं.देशात अजूनही खूप महत्वाचे मुद्दे आहेत.आपण यातच अडकून पडलो तर लोकांच्या अडचणी कशा दूर होणार?असा जाब विचारत सोनू सूदने बाकीच्या गोष्टींना महत्व देण्याची गरज नाही,"असे तो म्हणाला.खरं तर राजकारण्यांनी लोकांचे मुलभूत प्रश्न सोडवण्यात लक्ष द्यावे,लाऊडस्पीकरचा मुद्द्याने लोकांना फरक पडणार नाही.अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा: Raj Thackeray: राज ठाकरेंवर कारवाई होऊ शकते का?

"सकाळच्या अजानपुरता हा विषय नाही.'चार ते पाच वेळा बांग दिली जाते.त्यांनी ते परत केले तर आमची माणसं त्यावेळी हनुमान चालीसा वाजवणारच' अशी आक्रमक भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना घेतली होती.या त्यांच्या वक्तव्यावर आता सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे.या वादांमुळे महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचेही तो बोलला.

हेही वाचा: Raj Thackeray; राज ठाकरेंचं 4 तारखेच अल्टीमेटम

सोनू सूद हा टॉलीवूडबरोबरच बॉलीवूडमधेही लोकप्रिय अभिनेता आहे.तो कायम समाजातील अनेक गोष्टींवर बोलत असतो.कायम मदतीसाठी तत्पर असण्याऱ्या या अभिनेत्याला सध्या चाललेले धार्मिक वाद अजिबात आवडलेले दिसत नाही.म्हणून अखेर त्यानेही राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेली दिसते.

Web Title: Actor Sonu Sood Replied To Raj Takres Statementsaid Give Importance To Peoples Issues

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top