esakal | 'तिसरी लाट येतेय' दिशाच्या 'त्या' फोटोचं चाहत्यांनी केलं कौतूक
sakal

बोलून बातमी शोधा

disha patani

'तिसरी लाट येतेय' दिशाच्या 'त्या' फोटोचं चाहत्यांनी केलं कौतूक

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून दिशा पटानीचे (disha patani) नाव घ्यावे लागेल. गेल्या महिन्यात तिचा सलमान बरोबर (salman khan) राधे (radhe) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात ती मुख्य भूमिकेत होती. तिच्या चाहत्यांना ती भूमिका आवडली. सोशल मीडियावरही दिशा नेहमी चर्चेत असते. फिटनेस फ्रिक (fitness freak) म्हणून ती सर्वांची आवडती आहे. आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या तिच्या आणि टायगरच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ते गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र अजून त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. काहीही असलं तरी त्यांची जोडी प्रेक्षकांना कमालीची भावली आहे. (actress disha patani shares hottest photo till date people commented on social media)

कोरोनामुळे अनेक सेलिब्रेटींना पर्यटनासाठी बाहेर जाता येत नाही. दोन ते तीन महिन्यांपूर्वी कित्येक सेलिब्रेटींनी अंदमानची ट्रीप (andaman trip) केली होती. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दिशाला कोरोनामुळे कुठल्याही बीचवर जाता आलेले नाही. त्यामुळे तिनं आपले जुनेच फोटो पुन्हा शेयर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या त्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. एका हटके आणि वेगळ्या लूकमध्ये दिशाचा तो अंदाज चाहत्यांना आवडला आहे.

दिशा समुद्र किनाऱ्यावरील रेतीमध्ये फोटोशुट करताना दिसत आहे. तिच्या त्या सुंदर फोटोंना चाहत्यांनी मोठ्या संख्येनं लाईक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत. त्यावर टायगरची बहिण कृष्णानं देखील कमेंट केली आहे. एका फॉलोअर्सनं लिहिलं आहे की, तिसरी लाट येते आहे. तर आणखी एकानं तिची तुलना एका हरवलेल्या खोडरबराशी केली आहे. दिशा आपल्या लेपर्ड प्रिंट बिकीनीमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे. यापूर्वी देखील दिशानं आपले बिकिनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली आहे.

हेही वाचा: तेजश्री प्रधानचं स्वप्न पूर्ण झालं; सोशल मीडियावर केली खास पोस्ट

हेही वाचा: 'तु पहिली सलमानची माफी माग',अर्शीनं केआरकेला सुनावलं

एप्रिलमध्ये दिशा आणि टायगर हे मालदीवला गेले होते. त्यावेळी त्यांनी केलेलं हे फोटोशुट आहे. ती नेहमीच मालदीवचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट करत असते. दिशा आणि टायगरचे गेल्या अनेक वर्षांपासून अफेयर आहे. आणि त्याची चर्चा बॉलीवूडमध्ये आहे. दिशाचं टायगरच्या फॅमिली सोबतही चांगलं बाँडिग असल्याचे दिसून आले आहे.

loading image