अखेर कतरिना कैफची इच्छा पूर्ण; लॉकडाऊननंतर लगेच करणार सुरुवात 

katrina.
katrina.

मुंबई ः बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्रींपैकी स्वतःचं हक्काचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. उत्तम अभिनय, उत्कृष्ट फॅशन सेन्सच्या जोरावर कॅटने बॉलिवूडमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. अनेक चित्रपटांमध्ये तीने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत आणि आपले अभिनयकौशल्य तसेच नृत्यकौशल्य तिने सिद्ध केलं आहे.

सातत्याने काही तरी वेगळे आणि हटके करण्याचा कतरिना विचार करते आणि केवळ विचारच नाही तर ते पूर्ण करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करते. कॅट आता लवकरच एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिला बरेच दिवसांपासून एखाद्या सुपरहिरोसारखी भूमिका साकारण्याची इच्छा होती. आता तिची ही इच्छा पूर्ण झाली आहे. ती लवकरच सुपरहिरोची कथा असलेल्या एका चित्रपटात काम करणार आहे. लवकरच ती सुपरहिरोच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

अली अब्बास जफर यांचा हा चित्रपट असणार आहे. एका मुलाखतीत अली यांनी याचा खुलासा केला आहे, की त्याच्या पुढील चित्रपटात कतरिना सुपरहिरोची भूमिका साकारणार आहे. ते म्हणाले की, 'मी माझ्या सुपरहिरो चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण केली आहे. या चित्रपटात कतरिना मुख्य भूमिकेत असेल. लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करू.' या चित्रपट अॅक्शनपट असून यामध्ये कतरिना बरेचशे अॅक्शन करताना पाहायला मिळणार आहे. अली अब्बास जफर यांनी गुंडे, सुल्तान, टायगर जिंदा है अशा यशस्वी चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com