इमलीची अभिनेत्री मयुरी देशमुखच्या आजीचे निधन

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुखच्या (Mayuri Deshmukh) आजीचे निधन झाले आहे.
Mayuri Deshmukh
Mayuri Deshmukh
Updated on

Tv Entertainment: टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुखच्या (Mayuri Deshmukh) आजीचे निधन झाले आहे. तिनं सोशल मीडियावर (Social Media News) पोस्ट शेयर करुन त्याबाबत अधिक माहिती दिली आहे. इमलीची (Imlie) अभिनेत्री म्हणून मयुरीची ओळख आहे. तिनं इंस्टावरुन एक पोस्ट शेयर करुन आजीविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मयुरीच्या आजीच्या निधनाची बातमी कळताच मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटींनी श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय तिच्या नेटकऱ्यांनी देखील आदरांजली वाहताना मयुरीचे सांत्वन केले आहे. Actress Mayuri Deshmukh Grandmother passed away imlie serial

मयुरीनं इंस्टावर पोस्ट (Instagram Post) शेयर करताना लिहिलं आहे की, आजी आमचे प्रेरणास्थान तुम्ही होता. तुमचा हक्काचा आशीर्वाद आता त्या अनंतात विलीन झाला आहे. सात मुलांची आई, आमची आजी आणि काही जणांसाठी पणजी अशी भूमिका तुम्ही पार पाडली. आमच्या सर्वांसाठी तुम्ही आदर्श आहात. तुमचे विचार आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहतील. तुमची नेहमीच आठवण येत राहिल. तुमच्या आत्म्याला देव चिरशांती देवो हीच त्याच्याकडे प्रार्थना. अशा शब्दांत मयुरीनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Mayuri Deshmukh
Movie Review: समुद्राची गाज, दीपिकाचा रोमान्स 'गहराईयात' दुसरं नाही काही...

इमली या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या मयुरीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्या मालिकेतील अभिनयानं चाहत्यांवर छाप उमटवली आहे. 2020 मध्ये मयुरीच्या पतीचे निधन झाले होते. मयुरीचे पती आशुतोष भाकरे हे मराठी चित्रपट विश्वातील मोठे नाव होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मयुरीवर काळानं आघात केला आहे. पतीच्या निधनानंतर मयुरीनं मालिकाच्या कामात गुंतवून घेतलं.

Mayuri Deshmukh
Video Viral: पहाटेच्या अंधारात विकी-कतरिनाची लपाछपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com