याला म्हणतात धाडस! थेट नवऱ्यासमोरच बायकोला म्हंटलं I Love You..

Priyanka Chopra-Nick Jonas
Priyanka Chopra-Nick Jonasesakal
Summary

आज (1 डिसेंबर) प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे.

आज (1 डिसेंबर) प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यापूर्वी दोघंही ब्रिटिश फॅशन अॅवॉर्ड्समध्ये (British Fashion Award) एकत्र दिसले होते. या कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, घटस्फोटाच्या अफवांनंतर प्रियांका-निक एकत्र दिल्याने घटस्फोटाच्या चर्चांना पूर्ण विराम मिळालाय. एका व्हिडिओमध्ये निक प्रियांकाचा आउटफिट व्यवस्थित करताना दिसला होता. आता आणखी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालीय. यामध्ये एका चाहत्यानं प्रियांकाच्या नावानं ओरडत तिला I Love You.. म्हंटलंय. तेही थेट नवऱ्यासमोरच! यावेळी निकचा चेहरा पाहण्यासारखाच होता. त्यानं चाहत्याकडं कटाक्ष टाकत तो तिथून निघून गेला.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी हातात हात घालून घेतलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दोघंही ब्रिटिश फॅशन अॅवॉर्ड्समध्ये एकत्र दिसले होते. दरम्यान, या जोडीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये प्रियांका आणि निक कारमधून उतरल्यानंतर रेड कार्पेटवर फिरत आहेत. तेवढ्यात एका चाहत्याचा आवाज येतो, तो प्रियांकाचं नाव घेतो. निक त्या दिशेनं पाहू लागतो. प्रियांका त्याच्याकडं पाहून हात हलवते. तेव्हा तो चाहता प्रियांकाला ओरडत 'आय लव्ह यू' म्हणताना दिसतोय.

Priyanka Chopra-Nick Jonas
लग्न आहे की शिक्षा? विकी-कतरिनाच्या पाहुण्यांसाठी अटींची मोठी यादी

निक त्याला पाहण्यासाठी वळतो. दरम्यान, कोणीतरी निकच्या नावानं हाक मारतानाही दिसत आहे. तिथं पोहोचल्यानंतरही निक प्रियांकाचा आउटफिट व्यवस्थित करताना दिसतोय. प्रियांका चोप्रानंही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. अलीकडंच प्रियांकानं इन्स्टाग्रामवरून तिचं आडनाव काढून टाकलं होतं. यानंतर दोघांमधील अंतराची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, प्रियांका चोप्राची आई मधू यांनी हे वृत्त फेटाळून लावलं होतं.

Priyanka Chopra-Nick Jonas
'मिस केरळ'च्या मृत्यूचं गूढ उकललं; 'त्या' रात्री पार्टीनंतर नेमकं काय घडलं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com