राहुल रॉयची प्रकृती सुधारतेय; आयसीयूतून आणले बाहेर

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 2 December 2020

अभिनेता राहुल रॉय हा गेल्या काही दिवसांपासून ब्रेन स्ट्रोकच्या आजारानं त्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते.

मुंबई - आता फारसा कुणाच्या लक्षात नसलेला मात्र कोणे एकेकाळी आपल्या आशिकी या चित्रपटाच्या माध्यमातून स्टार झालेला अभिनेता राहुल रॉय हा गेल्या काही दिवसांपासून ब्रेन स्ट्रोकच्या आजारानं त्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्याला आयसीयुतून बाहेर आणण्यात आले आहे.

राहुल रॉय त्याचा आगामी चित्रपट ‘LAC- Live the Battle’च्या चित्रीकरणात व्यस्त होता. परंतु चित्रीकरणादरम्यानच त्याची अचानक तब्येत बिघडली. त्याला प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली होती. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून उपचारांनाही तो योग्य प्रतिसाद देत असल्याचे म्हटले जात आहे.

हे ही वाचा: कंगनाने बहीण रंगोलील दिलेलं बर्थ डे गिफ्ट पाहुन तुम्हीही पडाल प्रेमात  

‘आशिकी’ फेम अभिनेता राहुल रॉयच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरण दरम्यान ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्यामुळे त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा: अभिनेत्री किम शर्माला डेट करत असल्याच्या चर्चांवर अमित साधने सोडलं मौन  

एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या वृत्तानुसार  राहुलच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. त्याला आयसीयूमधून बाहेर आणण्यात आले आहे. यापूर्वी राहुलच्या मेहुण्याने, रोमीर सेनने त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. ‘आम्ही राहुल दादासोबत आहोत आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषधांचा त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी मदत होत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress rahul roy news now he out of danger