esakal | 'चंद्र आहे साक्षीला' मालिकेतल्या ऋतुजाचा बोल्ड अंदाज

बोलून बातमी शोधा

Rutuja Bagwe
'चंद्र आहे साक्षीला' मालिकेतल्या ऋतुजाचा बोल्ड अंदाज
sakal_logo
By
टीम ई सकाळ

मराठी चित्रपट आणि मालिकांमधील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. सध्या ऋतुजा ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ऋतुजा सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटोशूटचे फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत आसते. ऋतुजाचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर २० हजारहून अधिक फोलोअर्स आहेत. नुकताच ऋतुजाने एका बोल्ड फोटोशूटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये ऋतुजा बेडवर बसलेली दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा ब्लँकेट स्वत:भोवती गुंडाळला आहे. ऋतुजाच्या मालिकांमधील सोज्वळ अंदाजाला चाहत्यांची पसंती मिळाली होती. पण आता बोल्ड अंदाज सोशल मीडियावर चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी ऋतुजाच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच फुलवा खामकर, माधव देवचके, अश्विनी केसकर, माधवी निमकर या सेलिब्रिटींनीही ऋतुजाच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. फोटोग्राफर आशय तुलालकरने ऋतुजाचा हा फोटो काढला आहे.

हेही वाचा : 'सांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे?' सई ताम्हणकरच्या घराविषयीची पोस्ट चर्चेत

हेही वाचा : चुकीच्या उपचारामुळे बिघडला अभिनेत्रीचा चेहरा; डॉक्टरांवर केले आरोप

नुकताच ऋतुजाच्या अनन्या या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग गडकरी रंगायतन, ठाणे येथे पार पडला. ऋतुजा तिच्या नाटकांच्या प्रयोगाचे, मालिकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नांदा सौख्य भरे , तु माझा सांगाती या मालिकेमधून ऋतुजाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.