Rupal Nand: लग्नानंतर ९ महिन्यांनी मराठी अभिनेत्री पुन्हा मालिकेत, पहिल्यांदाच साकारणार ही भुमिका

अशीच एक अभिनेत्री लग्नानंतर पुन्हा एकदा मराठी मालिकेत कमबॅक करतेय
 rupal nand, rupal nand wedding, rupal nand wedding, rupal nand husbund, sony marathi, gunhyala mafi nahi
rupal nand, rupal nand wedding, rupal nand wedding, rupal nand husbund, sony marathi, gunhyala mafi nahiSAKAL
Updated on

Rupal Nand News: लग्नानंतर अनेक मराठी अभिनेत्री अभिनय क्षेत्रातुन ब्रेक घेतात. पण अशा काही अभिनेत्री आहेत ज्या लग्न झाल्यावर लगोलग पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रीय होतात. अशीच एक अभिनेत्री लग्नानंतर पुन्हा एकदा मराठी मालिकेत कमबॅक करतेय. ती म्हणजे रूपल नंद.

नेहमी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री रूपल नंद आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

(After 9 months of marriage, Marathi actress rupal nand will play role of police cop for the first time in a marathi serial)

 rupal nand, rupal nand wedding, rupal nand wedding, rupal nand husbund, sony marathi, gunhyala mafi nahi
Vishakha Subhedar: नाटकासाठी कायपण...! अमेरिकेत प्रयोगादरम्यान विशाखावर आली इस्त्री करण्याची वेळ

‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या नव्या मालिकेतून रूपल नंद प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात रूपलची नवी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

यापूर्वी निरनिराळ्या मालिकांमधून विशेष व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रूपल नेहमीच मग्न असते.

आता ती एका नव्या रूपात नव्या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना आपल्याला दिसणार आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे.

 rupal nand, rupal nand wedding, rupal nand wedding, rupal nand husbund, sony marathi, gunhyala mafi nahi
Nivedita Saraf यांच्या ६० व्या वाढदिवसाचं दणक्यात सेलिब्रेशन, अशोक सराफ झाले रोमँटिक

पोलीस आपल्या कामात नेहमी तत्पर असतात. दिवस-रात्र आपल्या कामाला महत्त्व देतात. आपल्या कुटुंबासाठी द्यायला पुरेसा वेळ त्यांच्याकडे नसतो.

आपल्या कामाला नेहमी प्राधान्य देतात. अशाच प्रकारची विशिष्ट व्यक्तिरेखा या मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटणार आहे, ती म्हणजे इन्स्पेक्टर भोसले.

आपल्या कामात नेहमी तत्पर असणारे इन्स्पेक्टर विजय भोसले यांच्या आयुष्यातील दुसरी बाजू, ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’! मालिकेतून उलगडणार आहे.

याव्यतिरिक्त अश्विनी कासारही या मालिकेतून पोलीस निरीक्षकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

१ मेपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता ही मालिका सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबद्दल फार कुतूहल आहे.

नवी मालिका ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’, १ मेपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com