Bramhastra बघितला अन् बॉलीवुड फेक! सिनेमाघरांना ८०० कोटींचं नुकसान झाल्याचा अग्निहोत्रींचा दावा

बॉलीवुड फेक का म्हणाले विवेक अग्निहोत्री?
bollywood is fake and done loss of 800 crore claimed vivek agnihotri
bollywood is fake and done loss of 800 crore claimed vivek agnihotri esakal
Updated on

Bramhastra: बहुचर्चित चित्रपट ब्रम्हास्त्र नुकताच शुक्रवारी सिनेमाघरांत प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. मात्र या संदर्भात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलेलं एक ट्विट चर्चेचा विषय ठरतंय. रणबीरच्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाने पीव्हाआर आणि आयनॉक्सचं ८०० कोटींचं नुकसान केल्याचा दावा अग्निहोत्रींनी एक रिपोर्ट शेअर करत केलाय. मात्र बॉक्स ऑफिस कलेक्शन संबंधित एका रिपोर्टनुसार ब्रम्हास्त्र चित्रपट यंदाचा बेस्ट ओपनर चित्रपट असल्याचं सांगितल्या जातंय. (bollywood is fake and done loss of 800 crore claimed vivek agnihotri)

ब्रम्हास्त्र हा बॉलीवुडमधील चर्चित चित्रपट रिलीज होताच सगळीकडेच चित्रपटसंबंधित चर्चांना उधाण आलंय. रिलीज होताच काही समीक्षकांचे निराशाजनक रिव्ह्यूज पुढे आलेत तर दुसरीकडे हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने तिकिटं बुक करताय. (Bollywood News) मात्र दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी या चित्रपटावर आता वादग्रस्त विधान केलंय.

bollywood is fake and done loss of 800 crore claimed vivek agnihotri
Bramhastra: रणबीरचा 400 कोटींचा 'ब्रम्हास्त्र' आपटणार की गाजणार?

थिएटरला ८०० कोटींचं नुकसान

विवेक अग्निहोत्री यांनी एक ट्विट केलंय, ज्यामध्ये त्यांनी बॉलीवुड फेक आणि बनवटी असल्याचं म्हटलंय. यासोबतच त्यांनी एक रिपोर्टही शेअर केली आहे. या रिपोर्टमध्ये ब्रम्हास्त्र चित्रपटामुळे पीव्हिआर आणि आयनॉक्सला ८०० कोटींचं नुकसान झाल्याचं म्हटलंय. हा चित्रपट यंदाचा बेस्ट ओपनर चित्रपट मानला जात असला तरी अग्निहोत्रींनी शेअर केलेली रिपोर्ट या चित्रपटाची दुसरी बाजू सांगणारी जाणवतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com