अहान शेट्टीचा रोमँटिक-अ‍ॅक्शन धमाका !

बहुचर्चित ‘तडप’चा ट्रेलर रिलीज
Manoranjan
ManoranjanSakal

प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीने (Sunil Shetty) बॉलीवूडमध्ये एक काळ गाजवला होता. आता त्याची मुलगी अथियापाठोपाठ मुलगा अहानही बाॅलीवूड इंडस्ट्रीत धमाकेदार पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. ‘तडप’ (Tadap) चित्रपटातून तो एक ॲक्शन अन् रोमँटिक अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अर्थातच चित्रपटासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. चित्रपटाबद्दलच्या अनेक खास गोष्टी तो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.

‘तडप’चा टिझर लाँच झाल्यापासूनच चित्रपटाच्या ट्रेलरची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. नुकताच चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला. अल्पावधीतच त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अमिताभ बच्चन यांच्यासह इतरही अनेक कलाकारांनी तडपच्या ट्रेलरचं कौतुक केलं. फॉक्स स्टार स्टुडिओची प्रस्तुती आणि सह-निर्मिती असलेल्या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. दिग्दर्शक आहेत मिलन लुथ्रिया. ट्रेलरमध्ये अहानची दमदार अ‍ॅक्शन पाहायला मिळते. त्याचबरोबर तारा सुतारियाबरोबर रोमान्स करतानाही तो दिसतोय. इशान आणि रमिसा असे त्यांच्या व्यक्तिरेखेची नावे आहेत.

Manoranjan
तालिबानी जनावरं पाहिलीत?, दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची चिडचिड

ट्रेलरमुळे आज संपूर्ण जगाला एका नव्या दमाच्या जोडीची एक झलक पाहायला मिळाली. अ‍ॅक्शन अन् रोमान्सने पुरेपूर भरलेल्या ट्रेलरमध्ये अहान खतरनाक बाईक स्टंट्स करताना आणि गुंडांशी दोन हात करताना दिसत आहे. त्याचा रावडी अंदाज पाहून तो इंडस्ट्रीतील अनेक अ‍ॅक्शन हिरोंच्या यादीत स्थान मिळवेल, अशी खात्री पटते. सोशल मीडियावर ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षक त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत. ट्रेलरमध्ये अहानला पाहूनच तरुणाई खूश झाली आहे. त्यांना आता प्रतीक्षा आहे ती चित्रपट रिलीज होण्याची... ‘तडप’ चित्रपट तेलगू ब्लॉकबस्टर ‘आरएक्स १००’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. ३ डिसेंबर २०२१ रोजी तो थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. वडिलांप्रमाणेच अहान बॉलीवूडमध्ये काय कमाल करतो ते पाहणे उत्सुकतेचे असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com