Ponniyon Selvan: रिलीज आधीच ऐश्वर्याच्या चित्रपटाला लागलं ग्रहण, कोर्टाची नोटीस... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ponniyin selvan slammed with court notice

रिलीज आधीच ऐश्वर्याच्या चित्रपटाला लागलं ग्रहण, कोर्टाची नोटीस...

पोन्नियन सेल्वम हा चित्रपट चोल साम्राज्याच्या संघर्षावर आधारित चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाताचा टीझर प्रदर्शित झाला होता. ऐश्वर्याच्या एन्ट्रीमुळे चाहत्यांना या चित्रपटाची मागल्या अनेक दिवसांपासून वाट होती. या चित्रपटाच्या ग्राफिक्सचीही सगळीकडे जोरदार चर्चा सुरू होती. भल्या मोठ्या बजेटचा हा चित्रपट मात्र पडद्यावर येण्याआधीच वादाच्या कचाट्यात आलाय. या चित्रपटातील एका चूकीमुळे कोर्टाने मेकर्सला नोटीस बजावली आहे. ऐश्वर्याच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. मात्र रिलीज आधीच या चित्रपटावर ग्रहण लागलेलं दिसतंय.

चित्रपटावर आहे हा आरोप

खरं तर हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र आता डायरेक्टर मणिरत्नक आणि अभिनेता विक्रमला नोटीस बजावली आहे. हा चित्रपट भारतावर १५०० वर्ष राज्य करणाऱ्या चोल वंशाच्या कथेवर आधारित आहे. मात्र चोल वंशाची ही कथा चित्रपटात चूकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप केला आहे. या ऐतिहासिक कथेतील तत्थ्यांचा तपास करण्यासाठी वकीलाने स्पेशल स्क्रिनींगची मागणी केली आहे. या स्पेशल स्क्रिनींगद्वारे या कथेतील ऐतिहासिक तत्थ्यांचा अभ्यास करत तपासणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा: Aishwarya Rai Good News: मणिरत्नम यांच्या 'PS1' मधून कमबॅक

या चित्रपटात राजवंशाबाबत असं काही दाखवण्यात येऊ शकतं ज्याचा खऱ्या कथेत दूरपर्यंत संबंध नाही असा संशय सेल्वन वकीलाने व्यक्त केलाय. खरं तर या चित्रपटाच्या अनाऊंसमेंटपासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. ऐश्वर्याचं या चित्रपटातील लूकही मनमोहक आहे. या चित्रपटात ऐश्वर्यासह विक्रम आणि तृषा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा: Chiyaan Vikram: विक्रमच्या मुलाने दिली वडिलांची हेल्थ अपडेट, म्हणाला सगळ्या 'अफवा...'

या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा चित्रपट भारतील सर्वात मोठ्या बजेटचा चित्रपट मानल्या जातोय. या चित्रपटाचा बजेट ५०० कोटी सांगितल्या जातोय. भारताच्या वेगवेगळ्या भागात या चित्रपटाची शुटिंग झाली आहे. हा चित्रपट हिंदी भाषेसह तमिळ, मल्याळम कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Aishwarya Ponniyin Selven Director Maniratnam And Actor Chiyaan Vikram Slammed With Court Notice

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top