Chiyaan Vikram: विक्रमच्या मुलाने दिली वडिलांची हेल्थ अपडेट, म्हणाला सगळ्या 'अफवा...'

विक्रमच्या मुलाने हेल्थ अपडेट देत विक्रमच्या प्रकृतीबाबत दिलेल्या सगळया बातम्यांना अफवा असल्याचे सांगितले आहे.
Chiyaan Vikram heart attack rumours
Chiyaan Vikram heart attack rumours esakal

मनोरंजन क्षेत्रात सगळीकडे साउथ सुपरस्टार विक्रमबाबत धक्कादायक बातमी पुढे आली होती.विक्रमच्या अचानक रूग्णालयात भर्ती झाल्याने त्याला हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या सगळीकडे वायरल झाल्या होत्या.चेन्नईच्या रूग्णालयात भर्ती झालेल्या विक्रमला हार्ट अटॅक आल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समधूनही करण्यात आला.मात्र आता विक्रमच्या मुलाने यावर अपडेट देत विक्रमच्या प्रकृतीबाबत दिलेल्या सगळया बातम्यांना अफवा असल्याचे सांगितले आहे.

'माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला नव्हता या सगळ्या अफवा आहेत', असं सांगत त्याने वडिलांबद्दल चाललेल्या बातम्यांना अफवा सांगितले आहे.वडिलांच्या हेल्थची अपडेट देत विक्रमचा मुलगा ध्रुव याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत या सगळ्या अफवांना खोटं ठरवलं आहे.

Chiyaan Vikram heart attack rumours
कॉफी पिणं पडू शकतं महागात; Heart Attack येण्याचा धोका

विक्रमबाबतच्या या अफवांबाबत ध्रुवने दु:ख व्यक्त करत माध्यमांना कुटुंबास एकटं सोडण्याची नम्र विनंतीही केली आहे.चियान विक्रमला लवकरच रूग्णालयातून सुट्टी मिळणार असल्याचंही त्याने यावेळी सांगितलंय.त्यांच्या छातीच्या दुखण्याने त्यांना रूग्णालयात दाखल केल्या गेलं होतं.मात्र माध्यमांनी त्यांना हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या जाहिर केल्या.त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवा यावेळी ध्रुवने खोट्या ठरवल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com