मिस वर्ल्ड बनन्यापूर्वी ऐश्वर्या रॉयनं केलं होतं खास फोटोशुट, मिळाले होते इतके पैसे| aishwarya rai bachhan 30 year old photoshoot | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aishwarya rai bachhan
मिस वर्ल्ड बनन्यापूर्वी ऐश्वर्या रॉयनं केलं होतं खास फोटोशुट, मिळाले होते इतके पैसे

मिस वर्ल्ड बनण्यापूर्वी ऐश्वर्या रायनं केलं होतं खास फोटोशूट, मिळाले होते इतके पैसे

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) आज अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली, तरी विश्नसुंदरी कायम चर्चेत असते. एवढंच नाही, तर तिच्या प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांची नजर असते. अशातच ऐश्वर्याचं ३० वर्षापूर्वीचे जुनं फोटोशुट व्हायरल होत आहे. हे फोटोशुट तिनं मिस वर्ल्ड बनन्यापूर्वी केलं होत. अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर गुन्हा दाखल; शिक्षण क्षेत्रात मोठा गैरव्यवहार

ऐश्वर्या रायचं 30 वर्ष जुनं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोशुटसोबत ऐश्वर्या रायच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील मॉडेलिंग बिलाची एक प्रत सोशल मीडियावर समोर आली आहे. बिलावर 23 मे 1992 ही तारीख आहे, म्हणजेच मिस वर्ल्ड खिताब जिंकण्यापूर्वी जवळजवळ दोन वर्षे पूर्वीचं हे फोटोशूट आहे.

हेही वाचा: बॉलीवूड अभिनेत्रीसोबतचं डेटिंग अन् धोका; कार्तिक आर्यननं अखेर केलं मान्य

एका मासिकाच्या शूटिंगच्या कामाच्या बदल्यात अभिनेत्रीला 1,500 रुपये मिळाल्याचे समोर आलं आहे.

विमल उपाध्याय नावाच्या ट्विटर यूझरने कॅटलॉग फोटो आणि मासिकाच्या मुखपृष्ठांसह मॅगझिन शूटमधील फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. या फोटोशुटवेळी ती केवळ १८ वर्षाची होती.

तिने कृपा क्रिएशन्स नावाच्या एका मॅगझिन कॅटलॉग शूटसाठी 'मॉडेल म्हणून काम करण्यास सहमती दर्शवली'. बिलाच्या तळाशी तिची सही असून मुंबईत हा करार झाला आहे. ऐश्वर्याने स्कॅल्प गाउनचा आऊच फीट परिधान केला होता.

ऐश्वर्या आणि सोनाली बेंद्रेचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ऐश्वर्याला ओळखणही कठीण झालं आहे.

ऐश्वर्या नुकतीच कान्स फेस्टीव्हलमधून मायदेशी परतली आहे. फेस्टिवल मधील तिचा लुक प्रचंड चर्चेत होता. फेस्टीव्हलच्या तिसऱ्या दिवशी ऐश्वर्याने सर्वांचे लक्ष वेधले होते.

Web Title: Aishwarya Rai Bachhan 30 Year Old Photoshoot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top