अजयने घेतली धोनीची भेट आणि सांगितला देशाचा धर्म!

टीम ई-सकाळ
गुरुवार, 9 जानेवारी 2020

बॉलिवूडचा सिंघम आपल्या भेटीला आल्याने धोनीच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे या फोटोत दिसत आहे. 

बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या 'तानाजी- द अनसंग हिरो' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शुक्रवारी (ता.10) हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो सध्या देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या पार्श्वभूमीवरच अजयने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा फोटो त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला असून त्याने या फोटोला दिलेले कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

- थलैवा रजनीचा 'दरबार' आलाय; फॅन्सची दिवानगी पाहून व्हाल थक्क

कॅप्शनमध्ये अजयने म्हटले आहे की, ''क्रिकेट आणि चित्रपट हे देशाला एकत्र आणणारे धर्म आहेत.'' बॉलिवूडचा सिंघम आपल्या भेटीला आल्याने धोनीच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे या फोटोत दिसत आहे. 

अजयने धोनीसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर थोड्या वेळातच फॅन्सनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव सुरू केला. अजय-धोनीला पहिल्यांदाच एकत्र पाहिल्यानंतर या दोघांच्या फॅन्सना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. 'टू लिजंड्स इन वन फ्रेम', 'सिंघम ऑफ बॉलिवूड अॅण्ड सिंघम ऑफ क्रिकेट' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी नोंदविल्या आहेत. 

- Video : मराठमोळ्या स्मृतीने घेतलेला अफलातून कॅच होताेय व्हायरल

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनचाही 'छपाक' हा चित्रपट 'तानाजी' सोबत रिलीज होत आहे. या दरम्यान, जेएनयूमधील विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीमुळे तिने तेथील विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमारही यावेळी तिच्यासोबत असल्याने ही गोष्ट नेटकऱ्यांना चांगलीच खटकली. आणि तिच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला.

- हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड आहे सूपर हॉट; पाहा फोटो

स्वराज्याचे शूरवीर सेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित 'तानाजी' हा चित्रपट उद्या रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजयने तानाजींची भूमिका साकारली असून त्याची पत्नी काजोलने सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. सैफ अली खान राजपूत किल्लेदार उदयभानच्या भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajay Devgn meets MS Dhoni on the occassion of Tanhaji movie release