'तान्हाजी' महाराष्ट्रात टॅक्स-फ्री केल्यानंतर अभिनेता अजय देवगण म्हणाला...

Ajay-Devgn
Ajay-Devgn

मुंबई : सध्या देशात 'तानाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तानाजी रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची घोषणा करत चित्रपटप्रेमींना सुखद धक्का दिला.

राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांचे शूरवीर सरदार तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित असणारा तानाजी हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री व्हावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार मागणी होत होती.

हा चित्रपट 3D मध्ये असल्याने तिकीटांची किंमतही खूप जास्त होती. यासाठी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोडही उठवली होती. मात्र, अखेर बुधवारी (ता.22) हा चित्रपट संपूर्ण राज्यात टॅक्स फ्री करण्यात आला. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

हरियाणा, उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये यापूर्वीच तानाजी टॅक्स फ्री करण्यात आला होता. आता महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करण्यात आला आहे. त्यानंतर या चित्रपटात तान्हाजींची भूमिका साकारणारा निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणने ट्विट करत राज्य सरकारचे आभार मानले आहेत. 

तो म्हणाला, 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार.'

'तानाजी : द अनसंग वॉरियर'मध्ये अभिनेता अजय देवगणने नरवीर तानाजी मालुसरेंची भूमिका साकारली असून त्याची रिअल लाईफमधील पत्नी काजोलने रिल लाईफमध्येही त्याच्या पत्नीचा रोल निभावला आहे. काजोलने तान्हाजींच्या पत्नी सावित्रीबाई यांची भूमिका चांगली वठवली आहे.

तर मराठमोळा अभिनेता शरद केळकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. सैफ अली खानने खलनायक आणि तत्कालिन कोंढण्याचा किल्लेदार उदयभानची साकारलेली भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. 

मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य आपल्या खांद्यावर पेलत हॉलिवूडला टक्कर देईल, असा भव्यदिव्य चित्रपट साकारला आहे. आणि याद्वारेच बॉलिवूडमध्ये दणदणीत पदार्पणही केलं आहे. 'तान्हाजी'ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुरळा उडवला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 150 कोटींहून अधिक गल्ला जमा केला असून त्याची 200 कोटींच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com