HBD Akshay Kumar : एकेकाळी गार्डने आतसुद्धा येऊ दिलं नव्हतं, त्याच जागी आज अक्षयचा आलिशान बंगला

अक्षयच्या परिस्थितीची ज्या बंगलोच्या गार्डने खिल्ली उडवली होती आज तिथेच त्याचा आलिशान बंगला आहे
HBD Akshay Kumar: know his struggle
HBD Akshay Kumar: know his struggleesakal

Akshay Kumar Birthday: तीन दशकांत बॉलीवुडला अनेक सुपरहिट चित्रपट देणारा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आज वयाच्या ५५ व्या वर्षात पदार्पण करतोय. त्याच्या करियरचा हा प्रवास दिसतो तेवढा सोपा मुळीच नव्हता. मात्र संघर्ष करत या अभिनेत्याने आज बॉलीवुडच्या बड्या अभिनेत्यांमध्ये स्थान मिळवलंय. त्याच्या वाढदिवशी त्याच्या सुरूवाती दिवसांचा असाच एक किस्सा आपण जाणून घेऊया. (HBD Akshay Kumar: know his struggle)

अक्षयच्या संघर्षमय दिवसांमध्ये त्याच्याजवळ फोटोशुट करण्याएवढे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने असिस्टंट म्हणून काम केलं आणि त्याला मिळणारा पगार फोटोग्राफरला फोटोशुटचे पैसे म्हणून ठेवण्यास सांगितला. हे शुट करण्यासाठी फोटोग्राफर आणि अक्षय मुंबईतील जुहूच्या एका जुन्या बंगल्यावर पोहोचले. मात्र बंगल्यातील गार्डने त्याला आत येण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने बंगल्याच्या बाहेरच्या भिंतीवर फोटोशुट केलं.

HBD Akshay Kumar: know his struggle
Cuttputli: चित्रपट फ्लॉप झाले म्हणून काय झाले माझी मार्केट व्हॅलू १ नंबर! मानधन ऐकून चक्रावून जाल

यशस्वी झाल्यावर अभिनेत्याने हीच प्रॉपर्टी विकत घेत त्याच्यावर स्वत:चा आलिशान बंगला बांधला. अक्षय कुमारने ४ वर्षाआधी अंधेरीमध्ये एक नवं घर खरेदी केलं होतं. त्याच्या या नव्या घराची किंमत जवळपास १८ कोटी रुपये होती. त्याचं हे घर २१ व्या मजल्यावर आहे. अक्षयने वेटर, शेफ आणि मार्शल आर्ट ट्रेनर म्हणूनही काम केले आहे. बॉलीवुडमध्ये कुठलेही गॉड फादर नसताना त्याने या क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com