
आलियाचा तब्बल 3 महिने रणबीरपासून लांब राहण्याचा निर्णय; कारणही सांगितलं
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टनं(Alia Bhatt) आपला बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत लग्न केल्यानंतर आपल्या सिनेमांच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त आहे. सध्या ती करण जोहर(Karan Johar) दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणवीर सिंग दिसणार आहे. या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मात्र आलिया हॉलीवूडसाठी प्रस्थान करणार असल्याचं बोललं जात आहे. लवकरच ती हॉलीवूडच्या सिनेमात पदार्पण करणार आहे ही बातमी आपल्याला माहित असली तरी त्याचं शूटिंग आता मे मध्ये सुरु होत आहे. अर्थात आता हेच मोठं कारण आहे ज्यामुळे आलिया-रणबीरमध्ये दुरावा येणार आहे.
हेही वाचा: ट्रेनमध्येच रंगली आयुषमान- नीना गुप्तांची मैफल; व्हिडिओ व्हायरल...
बोललं जात आहे की,आलिया भट्ट 'हार्ट ऑफ स्टोन' चं शूटिंग करण्यासाठी मे मध्ये यू.के ला रवाना होणार आहे. आलिया गैल गैडोट आणि जेमी डोर्नन सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार,'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चं शूटिंग शेड्युल पूर्ण केल्यानंतर लगेचच आलिया भट्ट आपल्या हॉलीवूड सिनेमाच्या शूटिंगसाठी यू.के ला रवाना होईल. ती मे ते ऑगस्ट महिन्या पर्यंत टॉम हार्पर दिग्दर्शित या हॉलीवूड सिनेमाचं शूटिंग करेल. आलिया भट्ट आपल्या इंटरनॅशनल सिनेमातील पदार्पणाविषयी खुप उत्सुक असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा: अमिषा पटेलवर करोडोंची फसवणूक केल्याचा आरोप; झारखंड हायकोर्टानं दिला दणका
हॉलीवूड सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आलिया फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' सिनेमाचं शूटिंग सुरू करेल अशीही बातमी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियंका चोप्रा आणि कतरिनासोबतच्या या सिनेमाचं शूटिंग आलिया भट्ट सप्टेंबरमध्ये सुरु करणार आहे. हा सिनेमा भारतात अनेक ठिकाणी शूट होणार आहे.
हेही वाचा: शत्रुघ्न सिन्हांवरील Sex Scam आरोपावर मुलगा लव सिन्हाचा मोठा खुलासा
आलिया भट्टचा सिनेमा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' पुढच्या वर्षी २०२३ मध्ये 'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्ट पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपल्या इतर सर्व प्रोजेक्ट्सचं काम आटोपून आपला आवडता दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या 'बैजू बावरा' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमात पुन्हा एकदा आलिया भट्ट रणवीर सिंग सोबत काम करणार आहे.
Web Title: Alia And Ranbir Will Not Meet For 3 Months A Big Reason Came
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..